Trending : अवघ्या 5 दिवसांत महिला दुसऱ्यांदा गरोदर! कारण सांगताना डॉक्टर म्हणाले...
Trending News : एक महिला अवघ्या 5 दिवसांत दोनदा गर्भवती राहिली आहे. आता हे ऐकून तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की हे कसे घडले?
Trending News : साधारणतः बाळाच्या जन्मासाठी 9 महिने इतका अवधी लागतो. निसर्गाने निर्माण केलेल्या पद्धतीनुसार प्रत्येक आई आपल्या मुलाला 9 महिने पोटात वाढवते, त्यानंतर ती मुलाला जन्म देते. तथापि, कधीकधी दोन मुले एका वेळी जन्माला येतात, ज्याला ‘जुळी मुले’ म्हणतात. कधी कधी ‘तिळी’ अर्थात तीन मुलंदेखील एकाचवेळी जन्माला येतात. तथापि, हे सामान्य नाही. पण, अनेकवेळा अशा बातम्या ऐकायला मिळतात, ज्या ऐकल्यानंतर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते.
आताही असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एक महिला अवघ्या 5 दिवसांत दोनदा गर्भवती राहिली आहे. आता हे ऐकून तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की हे कसे घडले?चला तर, जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...
दुप्पट आनंद!
मिररच्या रिपोर्टनुसार, सॅन पाब्लो, कॅलिफोर्निया येथे राहणारे जोडपे पालक बनणार होते. यापूर्वी त्त्यांना एकदा गर्भपाताचा सामना करावा लागला होता. सॅन पाब्लो येथील ओडालिस आणि तिचा पती अँटोनियो मार्टिनेझ ही आनंदाची बातमी ऐकून खूप आनंदित झाले होते. यानंतर ओडालिसने पहिले अल्ट्रासाऊंड केले. यावेळी डॉक्टरांनी तिला सांगितले की, ती एक नाही तर दोन मुलांची अर्थात जुळ्यांची आई होणार आहे.
हा तर चमत्कार!
आता तुम्ही विचार करत असाल की, यात नवल ते काय? तर, नवलाची गोष्टी अशी आहे की, या दोन्ही मुलांची गर्भधारणा एकत्र झाली नव्हती. एकाच आठवड्यात पाच दिवसांच्या अंतराने दोघांचीही स्वतंत्रपणे गर्भधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशी प्रकरणे क्वचितच पाहायला मिळतात. अनेक डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, अशी केस समोर येणे खूप दुर्मिळ आहे. ओडालिसच्या गर्भाशयात जरी दोन मुले वाढत होती, परंतु डॉक्टरांनी तिला सांगितले की, ही मुलं जुळी नाहीत. पाच दिवसांच्या कालावधीत या दोघांचीही गर्भधारणा झाली आहे.
हेही वाचा :
- Trending : तरुणीच्या गालावर 'ती' खळी नाहीच! भन्नाट आयडीया, सोशल मिडियावर ट्रोल
- माधुरीच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ; फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा पाऊस!
- PHOTO: सलमान आणि तिच्या व्हायरल झालेल्या फोटोवर सोनाक्षीनं दिली प्रतिक्रिया..
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha