एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Travel : 'मदर्स डे' जवळ आला..त्यापूर्वीच आईला द्या सरप्राईझ! भारतीय रेल्वेचे खास 3 टूर पॅकेज करा बूक, पालक होतील खूश

Travel :  जर तुम्ही तुमच्या पालकांना टूर पॅकेजद्वारे फिरायला पाठवले तर तुम्हाला त्यांच्या सहलीची चिंता करावी लागणार नाही. भारतीय रेल्वेचे खास पॅकेज

Travel : असं म्हणतात ना.. स्वामी तिन्ही जगाचा.. आईविना भिकारी.. आईचे थोर उपकार कधीच फेडता येणार नाही, मदर्स डे म्हणजेच जागतिक माता दिवस हा आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.. या दिवशी आपल्या आईच्या चेहऱ्यावर हास्य उमटण्यासाठी अनेकजण सरप्राईझ गिफ्ट वैगेरे देतात. 2024 चा मदर्स डे (Mothers Day) हा 12 मे रोजी जगभरात साजरा करण्यात येणार आहे. अशात तुम्हालाही तुमच्या आईला खास सरप्राईझ देत खूश करायचंय तर आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेच्या एका खास पॅकेज बद्दल सांगणार आहोत. ज्याची तुम्ही बुकींग करून तुमच्या पालकांना गिफ्ट दिले तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होईल.. जाणून घ्या

 आईचे थोर उपकार कधीच फेडता येणार नाही...

येत्या रविवारी 12 मे रोजी मदर्स डे साजरा होणार आहे. आईवर प्रेम दाखवण्याचा आणि या जगात तिचे किती महत्त्व आहे हे समजून घेण्याचा हा दिवस आहे. या दिवशी आईचे प्रेम, त्याग आणि समर्पण साजरे केले जाते. या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या आईला बाहेर कुठेतरी घेऊन जाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पालकांना एकट्याने सहलीला पाठवू शकता. खरं तर मुलं झाल्यानंतर पालकांना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळत नाही, ते नेहमी घरातील कामात आणि मुलांची काळजी घेण्यात व्यस्त असतात. म्हणून, त्यांना काही वेळ एकांतात घालवता यावा यासाठी मदर्स डेच्या दिवशी सहलीला पाठवता येईल. जर तुम्ही तुमच्या पालकांना टूर पॅकेजद्वारे फिरायला पाठवले तर तुम्हाला त्यांच्या सहलीची चिंता करावी लागणार नाही. कारण या पॅकेजमध्ये निवास, प्रवास आणि खाण्याच्या सुविधांचाही समावेश आहे.

वैष्णो देवी टूर पॅकेज

भारतीय रेल्वेने हे टूर पॅकेज देशाच्या अनेक भागांतून सुरू केले आहे.
5 मे नंतर या पॅकेजसह दररोज प्रवास करता येईल.
तुम्ही तुमच्या आईला धार्मिक टूरवर पाठवू शकता.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅकेजमध्ये तुम्हाला वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळेल.
पॅकेज 2 रात्री आणि 2 दिवसांसाठी आहे.
पॅकेजमध्ये दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती शुल्क 7660 रुपये आहे.

शिर्डी टूर पॅकेज

हे पॅकेज बंगळुरूपासून सुरू होत आहे.
5 मे नंतर तुम्ही दररोज या पॅकेजसह प्रवास करू शकता.
पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे.
पालकांसाठी हे टूर पॅकेज बुक करा.
दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी पॅकेज फी फक्त 8500 रुपये आहे.
यामध्ये हॉटेल, जेवणाचा खर्च, रेल्वे तिकीट आणि बसची सुविधा 5 दिवस उपलब्ध असेल.

उज्जैन टूर पॅकेज

हे पॅकेज 8 मे पासून सुरू होत आहे.
पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला भोपाळ, ओंकारेश्वर, सांची आणि उज्जैन येथे जाण्याची संधी मिळेल.
पॅकेज फी 16580 रुपये प्रति व्यक्ती आहे.
मदर्स डे येण्यापूर्वी हे पॅकेज तुमच्या पालकांसाठी बुक करा.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Travel : तिरुपती..रामेश्वरम..कन्याकुमारी अन् भारतीय रेल्वेकडून पुण्य कमावण्याची संधी, 'मे' मधील दक्षिण भारत यात्रा विशेष पॅकेज पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?Special Report : Bhagwat VS Owaisi : 3 मुलं जन्माला घाला..,भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा खोचक टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget