(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 11 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Uddhav Thackeray : 'सबका साथ मित्र का विकास', मिठागरं आणि धारावी अदाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray in Dharavi : आजपर्यंत आपण अनेकदा मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो. मात्र, केंद्र सरकार न्यायालयात गेले होते. तुमची जागा की आमची जागा असे सुरु होते. ती जागा आम्हाला नकोय आमच्या लोकांसाठी पाहिजे. नाही ही फक्त आमची जागा असे बोलले जात होते. तिथे मिठागर आहे. कांजूरला पण मिठागर आहे. Read More
Zeeshan Siddique : पक्ष सोडला नाही, पण झिशान सिद्दीकींनी मनातली सगळी खदखद बोलून दाखवली, म्हणाले...
Zeeshan Siddique : मुंबई: वांद्रे परिसरातील काँग्रेस पक्षाचे माजी नेते बाबा सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी वांद्रे येथील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात जाऊन पितापुत्रांची भेट घेतली Read More
Religious violence in India : दंगलींचे निवडणूक कनेक्शन, 30 वर्षांत 7 मोठ्या दंगलींनी राजकारण बदलले; यूपी-गुजरात प्रयोगशाळा!
Religious violence in India : भारतातील जातीय तणाव आणि निवडणुका यांचे नाते वर्षानुवर्षे जुने आहे. गेल्या 30 वर्षात निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचाराच्या 7 मोठ्या घटनांमध्ये देशाची स्थिती आणि दिशा बदलली. Read More
Pakistan Election : पाकिस्तानात अब की बार त्रिशंकू सरकार; जेलमध्ये असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाला तरुणांचे बळ!
तुरुंगात बंद असलेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संबंधित अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तानच्या तरुणाईने इम्रान खान यांना बळ दिल्याचे निकालातून स्पष्ट झालं आहे. Read More
Viju Mane : कुशलची एकांकिका म्हणून पाहायला गेलो अन्..., विजू मानेंनी सांगितला कुशल बद्रिकेचा 'स्ट्रगलर प्रवास'
Viju Mane Interview : 'स्ट्रगलर साला' या युट्युबवरील सिरीजचे दिग्दर्शक विजू माने यांनी कुशल बद्रिकेच्या स्ट्रगलविषयी एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. Read More
Jaga Char Divas : 'जगा चार दिवस' चित्रपटाचा पार पडला मुहूर्त, सिनेमातील पहिल्या गाण्याचे रेकॅार्डिंग पूर्ण
Jaga Char Divas : आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी जगण्याचा सकारात्मक मंत्र देणारा 'जगा चार दिवस' हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
IND vs AUS U19 Final : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्डकपसाठी भिडणार; बीडचा सचिन बाजी पलटवण्यास सज्ज!
India vs Australia U19 World Cup Final : दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने 9 व्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठली. भारताच्या विजयात बीड जिल्ह्यातील मराठमोळ्या सचिन धसने महत्त्वपूर्ण योगदान दिले. Read More
Virat Kohli AB devilliers : डिव्हिलियर्स कधी नव्हे तो जिवलग विराट कोहलीवर बोलून गेला आणि माफी मागायची वेळ आली!
Virat Kohli AB devilliers : विराट आणि अनुष्का (Anushka Sharma) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर विराट-अनुष्काबाबत जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान, डिविलियर्स आपले विधान मागे घेत माफीनामा जाहिर केला आहे. शिवाय, विराट दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे विधानही त्याने मागे घेतले आहे. Read More
Teddy Day 2024 : टेडी बेअर देऊन तुमच्या खास व्यक्तीला करा खुश; प्रत्येक रंगाच्या टेडीमागे असतो विशेष अर्थ, जाणून घ्या
Teddy Day 2024 : तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीकडे मनातील भावना व्यक्त करता येत नसेल तर हे काम एक क्युट टेडी बेअर अगदी सहजपणे करू शकतो. व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि अशात तुम्ही टेडी डेच्या दिवशी तुमच्या खास व्यक्तीला टेडी गिफ्ट करू शकता, जे पाहून ती व्यक्ती तुमच्या भावना समजून घेईल. Read More
कांद्याच्या दरात मोठी घसरण, प्रतिकिलो कांद्याला मिळतोय 1 ते 2 रुपयांचा दर; शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका
सध्या राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. कारण, कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे. Read More