Pakistan Election : पाकिस्तानात अब की बार त्रिशंकू सरकार; जेलमध्ये असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाला तरुणांचे बळ!
तुरुंगात बंद असलेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संबंधित अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तानच्या तरुणाईने इम्रान खान यांना बळ दिल्याचे निकालातून स्पष्ट झालं आहे.
इस्लामाबाद : अस्थिरतेच्या खाईत लोटल्या गेलेल्या पाकिस्तानमध्ये सार्वजनिक निवडणुकीत त्रिशंकू संसदेला जनतेनं कौल दिला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, विजयाचा दावा तीन पक्षांनी केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या शक्तिशाली लष्करप्रमुखांनी देशाला "अराजकता आणि ध्रुवीकरण"ला मुठमाती देण्याचे आवाहन केलं आहे. दोन माजी पंतप्रधानांनी निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे.
तरुणाईने इम्रान खान यांना बळ दिल्याचे निकालातून स्पष्ट
मात्र, बहुतांश निकालांसह, तुरुंगात बंद असलेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संबंधित अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तानच्या तरुणाईने इम्रान खान यांना बळ दिल्याचे निकालातून स्पष्ट झालं आहे. परंतु, लष्कराचे पाठबळ असलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी इतरांना युतीमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. निवडणुकीवर फसवेगिरी झाल्याचा आरोप पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे.
नॅशनल असेंब्लीच्या चौदा जागा अजून निश्चित व्हायच्या आहेत
कोणताही स्पष्ट परिणाम न मिळाल्याने, जनरल असीम मुनीर यांनी सर्व पक्षांना परिपक्वता आणि ऐक्य दाखविण्याचे आवाहन केले आणि म्हटले की ध्रुवीकरणाचे राजकारण शोभत नसल्याचे म्हटले आहे. नॅशनल असेंब्लीच्या चौदा जागा अजून निश्चित व्हायच्या आहेत. बलुचिस्तान प्रांतात असलेल्य जागांवर इम्रान खान आणि नवाज शरीफ यांनी विजयाचा दावा केला आहे.
विजयी उमेदवारांपैकी सुमारे 100 उमेदवार अपक्ष
जेलमध्ये असलेल्या इम्रान खान यांनी एआयच्या माध्यमातून व्हिडिओ संदेश जारी केला आहे. देशाची गुपित माहिती उघड करणे, भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर विवाह केल्याच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांच्या पीटीआय पक्षाला निवडणुकीत भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. विजयी उमेदवारांपैकी सुमारे 100 उमेदवार अपक्ष आहेत आणि त्यापैकी आठ वगळता सर्व उमेदवारांना पीटीआयचा पाठिंबा आहे.
शनिवारी पीटीआयचे अध्यक्ष गोहर अली खान म्हणाले की, पक्ष सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल आणि तोपर्यंत संपूर्ण निवडणूक निकाल जाहीर न झाल्यास रविवारपासून विरोध सुरू करेल. शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाने 73 जागा जिंकल्या आहेत. त्यांनी एकट्याने सरकार स्थापन करण्यासाठी संख्या नसल्याचे कबूल केलं आहे. परंतु युतीच्या नेतृत्वाखाली ते देशाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकतात असा आग्रह धरला आहे. हत्या झालेल्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पीपीपीला 54 जागा मिळाल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या