IIFA Awards 2022 : 'आयफा' पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार; कलर्सवर होणार प्रक्षेपण
IIFA Awards : 25 जून रोजी रात्री आठ वाजता प्रेक्षकांना 'आयफा' पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे.
IIFA Awards 2022 : 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' (IIFA) सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच हा पुरस्कार सोहळा अबुधाबीच्या यार बेटावर पार पडला. आता प्रेक्षकांना हा सोहळा घरबसल्या पाहायला मिळणार आहे. आज कलर्स चॅनलवर या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' सोहळा पार पडला नव्हता. त्यामुळे यंदाचा पुरस्कार सोहळा मोठा दिमाखात पार पडला आहे. प्रेक्षकांना हा पुरस्कार सोहळा आज 25 जूनला रात्री आठ वाजता कलर्स चॅनलवर पाहायला मिळणार आहे. कलर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.
#SalmanKhan and #SaraAliKhan really left everyone in splits with their hilarious brand endorsement!
— IIFA (@IIFA) June 25, 2022
Watch all the fun and entertainment of the NEXA IIFA Awards tonight, 8 PM onwards only on Colors#IIFA2022 @BeingSalmanKhan @SaraAliKhan @ColorsTV pic.twitter.com/1xSzj8cVrP
सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पार पडला 'आयफा' पुरस्कार सोहळा
'आयफा' पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी उपस्थितीत होते. सलमान खान, शाहिद कपूर, विकी कौशल, कृती सेनॉन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अनन्या पांडे, सारा अली खान, एआर रहमान, टायगर श्रॉफ, नोरा फतेही, यो यो हनी सिंह, पंकज त्रिपाठी या सेलिब्रिटींनी पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. अनेक सेलिब्रिटींना आयफा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. आता हे सर्व प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे.
Get ready to witness #NoraFatehi, #AnanyaPanday and #SaraAliKhan set the NEXA IIFA Awards stage ablaze with their mind-blowing performances!
— IIFA (@IIFA) June 24, 2022
Watch their spectacular performances on June 25th, 8 PM onwards only on Colors.#IIFA2022 @ananyapandayy @SaraAliKhan @ColorsTV pic.twitter.com/yG6OQEUKfo
'आयफा 2022' या पुरस्कार सोहळाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सलमान खान, रितेश देशमुख आणि मनीष पॉल यांनी सांभाळली होती. या पुरस्कार सोहळ्यातील सेलिब्रिटींचे रेड कार्पेट लूक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यामुळे आता या पुरस्कार सोहळ्याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या
IIFA Awards 2022 : सलमान खान करणार ‘आयफा 2022’चं सूत्रसंचालन, शाहिद कपूर देणार बप्पी दांना सांगीतिक श्रद्धांजली!
Aishwarya Rai : 'IIFA 2022'च्या रेड कार्पेट लूकमुळे ऐश्वर्या राय पुन्हा एकदा ट्रोल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)