Kalyan News : अक्षय शिंदेप्रमाणे विशाल गवळीलाही गोळ्या घाला, आमदार सुलभा गायकवाड यांची खळबळजनक मागणी
Kalyan News : कल्याणमधील घटनेतील आरोपी विशाल गवळीला गोळ्या घाला अशी मागणी आमदार सुलभा गायकवाड यांनी केली आहे.
कल्याण : कल्याणमधील (Kalyan) घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरुन गेला गेला आहे. कल्याण पूर्वेत अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोप विशाल गवळी (Vishal Gawali) याला परभणीतून ताब्यात घेतलं आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेसारखच (Akshay Shinde) विशाल गवळीला देखील गोळ्या घाला, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी देखील जे अक्षयसोबत झालं तेच विशालसोबत व्हावं अशी मागणी केली आहे. तसेच या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी देखील मागणी यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. या घटनेनंतर परिसरातील महिलांनी देखील संताप व्यक्त करत आरोपीला गोळ्या घालण्याची मागणी केलीये.
महिलांनी व्यक्त केला संताप
एबीपी माझासोबत बोलताना महिलांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात स्थानिक महिला आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी कल्याण कोळसेवाडी पोलिसांना निवेदन देखील दिले आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला ज्याप्रमाणे गोळ्या घालत्या त्याचप्रमाणे या आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
भिवंडी-कल्याण सीमेवरील गांधारी पुला नजीकच्या बापगाव या गावातील कब्रस्तान परिसरातील निर्जन स्थळी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक पडघा पोलिसांचे (Police) पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण (Kalyan) शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एक 13 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलगी सोमवारी संध्याकाळी चार वाजता पासून बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. मात्र, मुलीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा :
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध