UPSC Results: ठाणेकर डॉ. काश्मिरा संखे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिली
UPSC Results: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. देशातील पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी स्थान पटकावले असून महाराष्ट्रात देखील मुलींचा डंका यंदा पाहायला मिळाला आहे.
UPSC Results: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 (UPSCE) च्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यंदा पूर्ण देशात या परीक्षेमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. तर राज्यात देखील तेच चित्र पहायला मिळत आहे. ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे (Kashira Sankhe) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिली आहे. तर ती देशातून 25 वी आली आहे. आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात ठाण्याच्या डॉ.काश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. ती स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहे. स्वतःच्या डॉक्टकीचा व्यवसाय सांभाळून तिने हे यश मिळवलं आहे...आपल्या या यशाचं श्रेय तिने तिच्या आपल्या आईवडलांना दिल असून आता आयएएस ऑफिसर बनून देशाची सेवा करण्याचं तिचं स्वप्न आहे.
मानले सर्वांचे आभार
काश्मिराने 'सुरुवातीला जेव्हा निकाल पाहिला तेव्हा तिला विश्वास ठेवणं कठिण गेलं' अशी प्रतिक्रिया काश्मिराने एबीपी माझा सोबत बोलताना दिली. तसेच हे यश संपादन करण्यासाठी ज्यांनी तिला मदत केली त्या सर्वांचे काश्मिराने आभार मानले आहेत. तिचे कुटुंबिय, मित्रमैत्रीण आणि तिला अभ्यासात मदत करणारे तिचे शिक्षक या सर्वांना तिने तिच्या यशाचं श्रेय दिलं आहे.
'लहानपणापासूनचं स्वप्न पूर्ण'
काश्मिराने लहानपणापासून समाजासाठी काम करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी तिच्या पालकांनी देखील तिला मदत केली. कश्मिरा ही डॉक्टर असून ती डेंटिस्ट आहे. परंतु आता 'IASऑफीसर होऊन तिला लोकांसाठी आणखी काम करण्याची संधी मिळेल' असं काश्मिराने म्हटलं आहे. काश्मिराने तिचं शालेय शिक्षण मुंबईतच घेतलं. तर तिने तिच्या डॉक्टरकीचं शिक्षण मुंबईच्या शासकिय डेन्टल महाविद्यालयातून तिने तिचं वैद्यकिय शिक्षण पूर्ण केलं आहे. काश्मराने तिच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीसाठी तिने 2020 मध्ये सुरुवात केली होती. त्यांनतर तिने दोनदा यासाठी प्रयत्न केले परंतु त्यात तिला यश मिळाले नाही. परंतु आता तिसऱ्या प्रयत्नांत तिने चांगलीच बाजी मारली आहे. काश्मिराने मानवशास्त्र (anthropology ) हा विषय निवडला होता. वैद्यकिय शिक्षण घेतल्यामुळे तिने या विषयाची निवड केल्याचं काश्मिराने सांगितलं. काश्मिराच्या पालकांना देखील यावेळी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असून, त्यांच्या मुलीच्या यशाचा त्यांना अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
UPSC 2022 Results: यूपीएससी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर,यंदाच्या परीक्षेत मुलींचा डंका