ठाण्यात थंडीचा पारा वाढल्याने दिवसभर हवेत गारठ; नागरिकांनी घेतला शेकोटीचा आसरा
Thane: थंडीचा परिणामामुळे दिवसभर हवेत गारठा जाणवत आहे. तर दुसरीकडे वाढत्या थंडीमुळं सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या घटली आहे.
![ठाण्यात थंडीचा पारा वाढल्याने दिवसभर हवेत गारठ; नागरिकांनी घेतला शेकोटीचा आसरा Thane palghar Latest Marathi News Update temperature cold ठाण्यात थंडीचा पारा वाढल्याने दिवसभर हवेत गारठ; नागरिकांनी घेतला शेकोटीचा आसरा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/4fa13c0d11d3de6bab0b54824ba186831673887697560265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Thane Latest Marathi News Update: भिवंडी शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरत असल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच शहरासह ग्रामीण भागातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कडाक्याची थंडी वाजत आहे. या थंडीचा परिणामामुळे दिवसभर हवेत गारठा जाणवत आहे. तर दुसरीकडे वाढत्या थंडीमुळं सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या घटली आहे.
जिल्ह्यात सर्वात कमी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कल्याणात झाली. त्यापाठोपाठ भिवंडी व ग्रामीण भागासह डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाण्यातही पारा घसरलेला दिसून आला. त्यामुळे थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. सकाळी आणि रात्री चांगली थंडी जाणवत आहे. ठाणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून तापमान घसरल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने जवळपास सर्वच शहरात गारठा अनुभवास मिळाला. उत्तरेतून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे आणि कमी झालेल्या आर्द्रतेमुळे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात तापमानात घट होत असल्याचे सांगितले आहे. येत्या २,३ दिवसात असाच अनुभव येईल. पुढे तापमानात वाढ होईल असा अंदाजही व्यक्त केला आहे. दरम्यान आज तापमानात आणखी काही अंश सेल्सिअसने घट झाल्याने वातावरणातील गारठा आजही कायम असल्याने नागरिकांनी ठिकठिकाणी शोकोटी पेटवून उब घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
पालघरमध्येही हुडहुडी भरली
राज्याबरोबर पालघर जिल्ह्यात ही सध्या हुडहुडी वाढू लागली आहे आणि त्याचा परिणाम पालघर मध्ये सुद्धा जाणू लागला आहे पालघर जिल्ह्यातही थंडीचा कडाका जाणवू लागला लागला आहे अनेकांचे कपाटात गेलेले स्वेटर आणि कान टोप्या पुन्हा बाहेर निघू लागले आहेत. थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे,, आणि अशातच पुढील काही दिवस थंडीचा कडाका वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागांसह जव्हार मोखाडा विक्रमगड या भागातही थंडीचा प्रभाव जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे,, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना मार्गदर्शक सूचनाही देण्यात आले आहेत थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे तसेच आपली जे पशुधन आहेत यांची सुद्धा काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनाही कृषी विभागाकडून सल्ला देण्यात आलेला आहे की पिकांना पाणी देण्यासाठी रात्री किंवा पहाटेची वेळ निवडावी जेणेकरून जमिनीचे तापमान हे टिकून राहील. या थंडीच्या आगमनात मात्र तरुणाई ही उत्साहीत दिसून येत आहे थंडीचा आनंद घेत पहाटे समुद्रकिनारी तरुण वर्ग समुद्रकिनारी व्यायाम करताना दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)