Jitendra Awhad : ठाणे, मुंब्र्यात विसर्जनाच्या दिवशी डीजेला बंदी? हिंदू सणांवर निर्बंध न घालण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा; जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला
Jitendra Awhad On Eknath Shinde : हिंदू सणांवर कोणतेही निर्बंध घालणार नसल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता, तो पाळावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
मुंबई: ठाणे, कळवा आणि मुंब्रा या ठिकाणी गणेशोत्सवामध्ये डीजे (DJ) वाजविण्यास बंदी करण्यात आली आहे, ती मागे घ्यावी, हिंदू सणांवर कोणतेही निर्बंध घालणार नसल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला होता, तो पाळावा असा खोचक टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी लगावला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट (itendra Awhad Tweet) केलं आहे. त्यामध्ये एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ठाणे, मुंब्रा आणि कळवा या परिसरात डीजेला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे डीजे वाजताना दिसत आहे. मग या ठिकाणीच बंदी का घालती असा सवालही त्यानी विचारला आहे. हिंदू सणांना कुठलेही निर्बंध असणार नाहीत असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला होता. तो आता त्यांनी पाळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संपूर्ण ठाण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये डीजे वाजविण्यास बंदी करण्यात आली आहे. अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे डीजे वाजताना दिसतात. मोठ-मोठी गणपती मंडळे देखील डीजे समोर नाचत-गात बाप्पाला निरोप देतात. मग, ठाणे, कळवा, मुंब्र्यामध्ये बंदी कशासाठी? मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की हिंदू सणांना कुठलाही निर्बंध असणार नाही. त्यांनी तो शब्द पाळावा.
संपूर्ण ठाण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये डीजे वाजविण्यास बंदी करण्यात आली आहे. अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे डीजे वाजताना दिसतात. मोठ-मोठी गणपती मंडळे देखिल डीजे समोर नाचत-गात बाप्पाला निरोप देतात. मग, ठाणे, कळवा, मुंब्र्यामध्ये बंदी कशासाठी ?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 25, 2023
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की, हिंदू… pic.twitter.com/31tZxSliQj
Jitendra Awhad Tweet : आम्ही गणपती विसर्जन करणार नाही
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ मुब्र्यातील तरुणांचा आहे. त्यामध्ये म्हटलंय की, पुणे आणि मुंबईप्रमाणे मुब्र्यातही विसर्जनाच्या दिवशी डीजेला परवानगी द्यावी. जर डीजेला परवानगी दिली नाही तर आम्ही विसर्जन करणार नाही.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मागणीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात आणि त्यांना काय उत्तर देतात हे पाहावं लागेल.
ही बातमी वाचा: