Bhiwandi News : भिवंडीतून 1 कोटी 38 लाख रुपयांची रुग्णालय उपकरणे चोरीला, 24 तासातच आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश
भिवंडीतून (Bhiwandi) 1 कोटी 38 लाख 5 हजार 627 रुपयांच्या उपकरणांची चोरी झाल्याची (Theft Hospital Equipment) घटना घडली.
Bhiwandi News : भिवंडीतून (Bhiwandi) 1 कोटी 38 लाख 5 हजार 627 रुपयांच्या उपकरणांची चोरी झाल्याची (Theft Hospital Equipment) घटना घडली आहे. ही घटना मानकोली (Mankoli) इथं घडली आहे. अवघ्या 24 तासातच नारपोली पोलिसांनी (Narpoli Police) या याप्रकरणाचा छडा लावला आहे. याप्रकणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्या आरोपी जवळून चोरीस गेलेला 1 कोटी 25 लाख 61 हजार 968 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी यासंबंधीची माहिती दिली.
15 जानेवारीच्या मध्यरात्री झाली होती घरफोडीची घटना
भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील गोदमात रुग्णालय उपकरणे ठेवली होती. ही उपकरणे चोरीला गेली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून ते साहित्य जप्त करण्यात आले आहे. मानकोली वेहळे रोड येथील श्री माँ बिल्डींग या गोदमातील दोन गाळ्यांमध्ये महागडे सोनोग्राफी, रोबोटीक रुग्णालय उपकरणे साठवली होती. त्याठिकाणी 15 जानेवारीच्या मध्यरात्री घरफोडी होऊन 1 कोटी 38 लाख 5 हजार 627 रुपयांच्या उपकरणांची चोरी करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर कंपनीच्या वतीने 19 जानेवारी रोजी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील आणि त्यांच्यासोबत पोलीस असणाऱ्या पथकाने घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना गोदाम परिसरात लाईट अथवा सीसीटीव्ही नसल्यानं आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
तीन साथिदारांच्या मदतीने चोरीची घटना
दरम्यान, घटनास्थळाच्या काही अंतरावरील आजुबाजुस असलेले सिसिटीव्हीमध्ये पहाटेच्या सुमारास एका गाडीच्या लाईटचा प्रकाश दिसून आला. तोच धागा पकडून त्या रस्त्यावरील पुढील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. त्यामध्ये आढळलेले संशयित पीकअप टॅम्पो वाहन असल्याचं समजल्यावर पोलीस शिपाई सचिन देसले आणि जनार्दन बंडगर यांनी या मार्गावरील 34 ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करून टॅम्पोचा क्रमांक एम एच 04 जी आर 8446 असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून टॅम्पो मालक मोहमंद सलीम मोहमंद इद्रीस चौधरी (वय 41,रा.घुंघटनगर भिवंडी) यास ताब्यात घेतले. तसेच त्याची कसून चौकशी केली. यावेळी तीन साथिदारांच्या मदतीने चोरी करून सदरचा माल हा त्याच्या टॅम्पोमधून घेवुन गेला असल्याचे कबुल केले. त्यानंतर आरोपी मोहमद सलीम चौधरी यास या घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्या जवळून 1 कोटी 25 लाख 61 हजार 968 रुपये किंमतीची उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :