एक्स्प्लोर

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत महायुतीला ओबीसींची एकगठ्ठा मतं मिळतील का, या प्रश्नावर अजित पवार यांनी नकारार्थी उत्तर दिले.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष जमिनीवर जातीय ध्रुवीकरण होईल, असे मला वाटत नाही, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात जातीय आधारावर मतदान झाल्यास बिगरमराठा मते महायुतीला (Mahayuti Allaince) मिळतील का, असा प्रश्न अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या विचारधारेचा आहे, ही विचारसरणी महाराष्ट्रात घट्ट रुजली आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये जी राजकीय समीकरणे प्रभावी ठरतात ती महाराष्ट्रात चालणार नाहीत, असे अजित पवार यांनी म्हटले. ते 'द इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

यावेळी अजित पवार यांना भाजपने यापूर्वी यशस्वीपणे राबविलेल्या माधव (माळी, धनगर, वंजारी) फॉर्म्युलाबाबत विचारण्यात आले. यावर अजित पवार यांनी म्हटले की,माधवं फॉर्म्युला हा त्यावेळी यशस्वी ठरला होता. तेव्हा भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे, ना.स. फरांदे आणि अण्णा डांगे यांच्यासारखे दिग्गज ओबीसी नेते होते. माधव फॉर्म्युलामुळे सर्वाधिक धुव्रीकरण हे वंजारी समाजात झाले होते. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या एका आदेशावर निवडणुकीचा निकाल बदलायचा. परंतु, आता तसे घडताना दिसत नाही. कारण आता विशिष्ट समाजाचे मतदार एका मर्यादेपर्यंतच विशिष्ट नेत्यांना पाठिंबा देताना दिसतात. वंजारी समाजात आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रुपाने नवीन नेतृत्व दिसत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतही भाष्य केले. मनोज जरांगे यांनी काही उमेदवारांना पराभूत करण्याच आवाहन केले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा हक्क असतो. त्यामुळे जनताच काय तो निर्णय घेईल. महाराष्ट्राने आजपर्यंत जातीच्या आधारावर मतदान करणे टाळले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता फेटाळली

अजित पवार यांनी या मुलाखतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली. या निवडणुकीत महायुतीला 175 जागा मिळतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीला मतदारांनी पवारसाहेबांना प्राधान्य देऊन सुप्रिया सुळे विजयी केले. त्याप्रमाणे विधानसभेला बारामतीमध्ये माझा विजय होईल, असे शरद पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

अजितदादा म्हणाले, मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी फिरत आहेत का? आता शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget