Pune News : पुण्यातील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतन कार्यालयात चोरी; महत्वाचे कागदपत्रे चोरले
पुण्यातील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतन या कार्यालयात चोरी झाली आहे. यामुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ उडाली आहे.
Pune News : पुण्यातील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतन (Education) या कार्यालयात चोरी झाली आहे. यामुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ (Theft) उडाली आहे. परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेची संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव यासारखे कागदपत्र चोरीला गेल्याची माहिती आहे. 2007 ते 2019 या दरम्यानचे कागदपत्रे चोरीला गेली आहेत.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतनचे कार्यालय पुण्यात आहे. या कार्यालयातील जुने वसतिगृह येथील एका रेकॉर्ड रुममध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतनचे कार्यालय पुण्यात असून त्या ठिकाणी एक जुने बंद स्थितीत असलेले एक वसतिगृह आहे. या ठिकाणी एका खोलीचे कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेची संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव, पात्रता फॉर्म, पुनर्गुण मूल्यांकन अर्ज, फोटोकॉपीचे अर्ज असे महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेले आहेत.
तात्काळ पोलिसांत तक्रार
हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्काळ पोलिसांत तक्रार देण्यात आली. याप्रकरणी पुण्यातील चतुशृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...