एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Maharashtra CM Post: देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार, याबाबत एक महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.

मुंबई: मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावे, अशी भाजप पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची (Maharashtra CM) कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असणार की दिल्लीत याबाबतच्या चर्चेचा पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला गेल्यावेळपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.  राज्यात 2019ला आमच्या 105 जागा आल्या. आता त्याहीपेक्षा आमच्या जास्त जागा येतील. त्यापेक्षा कमी येणार नाहीत. विदर्भातही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यापूर्वी एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमातही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी आपण इच्छूक नसल्याचे सूतोवाच केले होते.  मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

एकनाथ शिंदेंनी पक्षसंघटन विस्तारले, म्हणून अजितदादांपेक्षा जास्त जागा दिल्या: देवेंद्र फडणवीस

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त जागा का मिळाल्या, या प्रश्नाचे उत्तर दिले. एकनाथ शिंदे हे जवळपास अडीच वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांची ताकद निर्माण केली. अजित पवार एक वर्षे उशिराने सरकारमध्ये आले. त्यांना दीड वर्षेच मिळाले. त्यातही अजित पवार यांना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्यासोबत लढा द्यायचा असल्याने त्यांची सर्व ताकद प्रयत्नपूर्वक एकवटायची होती. त्यातच त्यांचा सुरुवातीचा काळ गेला. एकनाथ शिंदे यांच्याकडे पुरेसा वेळ होता. त्यांनी त्यांची ताकद एकवटत विस्ताराकडेही लक्ष दिले. शिवाय त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचाही फायदा मिळाला. त्यामुळेच त्यांना लढविण्यासाठी जास्त जागा मिळाल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तसेच महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जास्त जागा, स्ट्राइक रेट असे कोणतेही निकष ठरलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार  आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

आणखी वाचा

विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget