कल्याण पूर्वच्या जागेवर गणपत गायकवाडांचाच पहिला दावा; भाजपच्या रविंद्र चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं
Kalyan East Assembly Election : कल्याण पूर्वच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी भाजपचे गणपत गायकवाड हे आमदार आहेत.
![कल्याण पूर्वच्या जागेवर गणपत गायकवाडांचाच पहिला दावा; भाजपच्या रविंद्र चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं bjp ravindra chavan clarify ganpat gaikwad will bjp candidate from kalyan east assembly constituency vs shiv sena eknath shinde thane news कल्याण पूर्वच्या जागेवर गणपत गायकवाडांचाच पहिला दावा; भाजपच्या रविंद्र चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/28/cb47e57828aa2fcda7919ab71229e30d172216382636993_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : कल्याण पूर्वच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून गणपत गायकवाड यांचाच पहिला दावा असल्याचं राज्याचे मंत्री आणि भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं. कल्याण पूर्व या जागेवर शिवसेना शिंदे गटाकडूनही दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य हे महत्त्वाचं मानलं जातंय.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्याचं दिसतंय. भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कल्याणच्या कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली.
गणपत गायकवाडांचा पहिला दावा
मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, गेले वर्षानुवर्षे या भागामध्ये आमदार गणपत शेठ गायकवाड हे काम करतात, सातत्याने निवडून येत आहेत. आपला माणूस असंच त्यांना संबोधलं जातं. त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे गणपत गायकवाड हेच उमेदवार असावे असं वाटतंय. त्यामुळे या बैठकीला त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. गणपत गायकवाड हे महायुतीमध्ये आमदार म्हणून आहेत. महायुतीला विधानपरिषदेमध्ये आवश्यकता भासली त्यावेळेस ते त्या ठिकाणी आले होते.
इच्छुक असण्यात गैर काय?
कल्याणच्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रथम भारतीय जनता पार्टीचा दावा आहे. तसं डोंबिवलीमध्ये मी वर्षानुवर्षे निवडून येत आहे. त्या ठिकाणी बरेच जण इच्छुक आहेत. स्वाभाविकपणे इच्छुक असणं ही काय चूक नाही. परंतु त्या त्या पक्षाने दावा करणे हे पण योग्यच आहे. प्रत्येकाने काय करावं, त्यांच्या पक्षाने काय करावं, प्रत्येक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी काय कराव हा त्यांचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा वेगळा आहे, त्यांची वेगळे आयडेंटी आहे. पक्षश्रेष्ठी जसं आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करतो.
कल्याण पूर्वच्या जागेवर भाजपचे गणपत गायकवाड हे निवडून आले आहेत. पण शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी पोलिस स्थानकात गोळीबार केला होता. त्यानंतर ते सध्या तुरुंगात आहेत. कल्याण पूर्वची जागा आपल्याला मिळावी यासाठी शिंदे गटाकडूनही प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)