मोठी बातमी : बदलापूर पुन्हा हादरले, रेल्वे स्टेशनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण
बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झालाय. या गोळीबारात एकजण गंभीररित्या जखमी झालाय.
![मोठी बातमी : बदलापूर पुन्हा हादरले, रेल्वे स्टेशनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण Badlapur Crime firing at railway station An atmosphere of fear among passengers Crime News Marathi News मोठी बातमी : बदलापूर पुन्हा हादरले, रेल्वे स्टेशनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/05/1dd3618f3890fbb9ccbd657ba3ce01aa1725545707341924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Badlapur : मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थनाकात होम प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंदाधूंद गोळीबाराची घटना घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे चार अज्ञात शार्प शूटरकडून स्थानकात घुसून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पैशाच्या देवाण घेवाणीवरुन हा वाद झालाय. जखमी आणि पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.
चार जणांच्या टोळीकडून प्लॅटफॉर्म उभ्या असलेल्या दोघांवर गोळीबार
बदलापूर रेल्वे स्थनाकात सायंकाळच्या सुमारास प्रवाशी लोकलची वाट उभे होते. त्याच सुमारास अचानक होम प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर चार जणांच्या टोळीकडून प्लॅटफॉर्म उभ्या असलेल्या दोघांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराचा आवाज होताच रेल्वे स्थानकात एकच पळापळ होऊन प्रवाश्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तर दुसरीकडे एका आरोपीने गोळीबार करत तो रेल्वे रुळावरून धाव असतानाच आरपीएफ जावांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले मात्र त्याच्या हातातील रिव्हालवर रेल्वेच्या ट्रॅक मध्ये पडली.
एकाच्या पायात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी
या गोळीबाराच्या घटनेत दोघांवर गोळीबार केल्याने त्यापैकी एकाच्या पायात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत तपास सुरू केला आहे. गोळीबार करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा गोळीबार जुन्या वादातून झाल्याची माहिती समोर येत आहे. विकास नाना पगारे असे गोळीबार प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. तर शंकर संसारे असे जखमीचे नाव आहे. जखमीचा जबाब घेऊन गुन्हा नोंदवाण्याची प्रक्रिया सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)