एक्स्प्लोर

जेसीबी दुर्घटनेतील पीडित कटुंबीयांस 50 लाखांची मदत, भावालाही नोकरी; मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने 35 लाख रुपये तर 15 लाख विम्याचे असे एकूण 50 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

ठाणे : फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबीयांस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याहस्ते 50 लाख रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राकेश यादव यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे (thane) येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला. यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच एमएमआरडीए आणि एल अँड टीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्सोवा खाडीजवळील घटनास्थळी भेट दिली होती. त्यावेळी, पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करत मदतीनिधीची घोषणाही केली. त्यानुसार, आज मदत करण्यात आली आहे.

वसईतील वर्सोवा येथे सूर्या प्रकल्पाचे काम सुरू असताना 50 फूट खोल खड्ड्यात पोकलेन काम करत असताना त्यावर सिमेंटचा गर्डर कोसळून दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेला 25 दिवस उलटले तरी पोकलेन चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने 35 लाख रुपये तर 15 लाख विम्याचे असे एकूण 50 लाख रुपयांचा धनादेश आज राकेश यादव यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला. तसेच, राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे. एमएमआरडीएच्यावतीने वर्सोवा खाडीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी जेसीबी ऑपरेटर असलेल्या राकेश यादव हे जेसीबीसकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी 17 दिवस प्रयत्न करूनही त्याचा तपास होऊ शकला नाही, अखेर याठिकाणी सैन्यदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ एसडीआरएफच्या जवानांना एकत्रितपणे मंडतकार्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचावकार्यामुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र, तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तत्पूर्वी कुटूंबाला मदत म्हणून हा मदतनिधी आज त्यांच्या कुटुंबीयांच्या हाती सुपूर्द करण्यात आला. 

दरम्यान, यावेळी एमएमआरडीएचे सह- आयुक्त राधबिनोद शर्मा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंते श्री चामलवार, एमएमआरडीएचे वरिष्ठ अभियंते  हनुमंत सोनवणे, एल अँड टीचे प्रकल्पप्रमुख श्री कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर हेदेखील यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा

संतापजनक! पुण्यात 13 वर्षीय मुलीवर वडील, काका अन् चुलत भावाकडून बलात्कार 

पुण्याजवळ झाडावर आदळून बसचा चेंदामेंदा; भीषण अपघातात 30 प्रवासी जखमी, काहीजण गंभीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
×
Embed widget