(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संतापजनक! पुण्यात 13 वर्षीय मुलीवर वडील, काका अन् चुलत भावाकडून बलात्कार
पुणे ही शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारं शहर म्हणून नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात घटणाऱ्या घटनांमुळे पुण्याची संस्कृती लयाला गेल्याची टीकाही होत असते.
पुणे : अपघातांच्या घटनांनी गेल्या काही दिवसांपासून हादरलेल्या पुण्यात काल मध्यरात्री आणखी एक भीषण अपघात (Accident) घडला. यावेळी, आमदाराच्या पुतण्याच्या कारने दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी आहे. दुसरीकडे पुण्यातील कोयता गँगनेही धुमाकूळ घातल्याने पुण्यातील अपघात आणि गुन्हेगारीमुळे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. त्यातच, आता पुणे (Pune) शहराला हादरवरुन सोडणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील एका 13 वर्षीय मुलीवर चक्क वडील, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस (Police) अधिक तपास करत आहेत.
पुणे ही शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारं शहर म्हणून नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात घटणाऱ्या घटनांमुळे पुण्याची संस्कृती लयाला गेल्याची टीकाही होत असते. त्यातच, आता अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसरमध्ये एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुलीचे वडिल, चुलते आणि चुलत भावानेच हा बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने दिले आहे. पीडित मुलीने यासंदर्भात आईकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते जून 2024 या कालावधी दरम्यान घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आई, वडील, काका व चुलत भाऊ यांसह एकत्र कुटुंबात मांजरी भागात वास्तव्यास असून हे कुटुंबीय परप्रांतीय आहे. पीडित मुलीवर जुलै 2022 मध्ये तिच्या चुलत भावाने राहत्या घरामध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर भावाने तिला ठार मारण्याची धमकीही दिली होती. तर, जानेवारी 2024 मध्ये पीडित तरुणीच्या काकाने रात्रीच्यावेळी फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केल्याचेही आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा
पुण्याजवळ झाडावर आदळून बसचा चेंदामेंदा; भीषण अपघातात 30 प्रवासी जखमी, काहीजण गंभीर
आमदाराच्या पुतण्याच्या गाडीनं दोघांना चिरडलं; नेमका कसा घडला अपघात? घटनेची A to Z इन्साईड स्टोरी