एक्स्प्लोर
Yu Yunique 2 स्मार्टफोन लाँच, किंमत 5,999 रुपये
Yu Yunique 2 स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला असून हा स्मार्टफोन Yu Yuniqueचा अपग्रेडेड व्हर्जन आहे.

मुंबई : YU टेलिवेंचर आणि मायक्रोमॅक्सनं YU युनिक 2 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे. 27 जुलैला दुपारी 12 वाजेपासून या फोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन 4G VoLTE सपोर्टिव्ह असणार आहे. Yu Yunique 2 स्मार्टफोनचे खास फीचर : - या स्मार्टफोनमध्ये 5 इंच स्क्रिन असून त्याचं रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल आहे. तसेच यामध्ये गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन असणार आहे. - यामध्ये 1.3GHz क्वॉड कोअर MT6737 प्रोसेसर आहे. यासोबतच 2 जीबी रॅमही असणार आहे. - हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या नॉगट व्हर्जनवर आधारित असणार आहे. - या स्मार्टफोनमध्ये 16 जीबी मेमरी देण्यात आली असून एसडी कार्डनं 64 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. - यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे. - याची बॅटरी 2500 mAh आहे. - या फोनमध्ये 4जी, 3जी, वाय-फाय, जीपीएस असणार आहे.
आणखी वाचा























