एक्स्प्लोर
यूट्यूबची सेवा पुन्हा सुरु
यूट्यूबवर व्हिडओ प्ले होताना येणाऱ्या एररचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकले जात होते. ट्विटरवर तर #YouTubeDOWN हॅशटॅगही ट्रेण्ड होते.

नवी दिल्ली : यूट्यूबची सेवा पुन्हा सुरु झाली आहे. जगभरात पहाटेपासून यूट्यूबच्या वेबसाईटवर एरर दिसत होता. कोणताही व्हिडओ यूट्यूबच्या साईटवर प्ले होत नव्हता. मात्र, अखेर यूट्यूबच्या तांत्रिक टीमने तातडीने दखल घेत, यूट्यूबची सेवा पुन्हा सुरु केली.
यूट्यूबवर व्हिडओ प्ले होताना येणाऱ्या एररचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकले जात होते. ट्विटरवर तर #YouTubeDOWN हॅशटॅगही ट्रेण्ड होते.
यूट्यूबच्या वेबसाईटवर गेल्यावर तिथे '500 Internal Server Error' असा एरर दिसत होता. शिवाय, इतर व्हिडीओही दिसत. मात्र व्हिडीओवर क्लिक केल्यानंतर व्हिडीओ प्ले होत नव्हते.
अनेकांना आपल्या फोन किंवा कॉम्प्युटरमध्ये काही समस्या असल्याचे वाटले होते. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर जगभरातून यासंदर्भात ट्वीट आणि पोस्ट शेअर होऊ लागले आणि सगळीकडेच यूट्यूब बंद असल्याचे समोर आले. अखेर यूट्यूबने तांत्रिक बिघाड दुरुस्त करत सेवा पुन्हा सुरु केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
