एक्स्प्लोर

भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला

भाजपचे भिवंडी शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी महापौर पदाच्या उमेदवार म्हणून स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे.

ठाणे : भिवंडी महापालिका महापौरपदाच्या(Mayor) निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले असून महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने (BJP) आपला उमेदवार बदलला आहे. त्यानंतर, भाजपमध्ये दोन गट पडल्याने आता भिवंडी (Bhiwandi) महापालिकेत महापौर कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. भाजपने यापूर्वी नारायण चौधरी यांना भाजपच्या महापौरपदाचे अधिकृत उमेदवार घोषित केले होते. नारायण चौधरी यांनी भाजपकडून महापौर पदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण लागले असून भाजपने ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलला आहे. त्यामुळे, भाजप नगरसेवकांतच फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजपचे 9 नगरसेवक फुटल्याची माहिती आहे. 

भाजपचे भिवंडी शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी महापौर पदाच्या उमेदवार म्हणून स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यासंदर्भातील लेखी पत्र भाजप शहराध्यक्षांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना दिले. तर, भाजपने आता स्नेहा मेहुल पाटील यांची महापौरपदाची अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे, नारायण चौधरी नाराज झाले असून त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. मला भाजपने महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला होता. मात्र, महायुतीतील घटक पक्ष सोबत यायला तयार नव्हते, त्यांच्याशी अनेकवेळा मिटींग केल्या. मात्र घटक पक्ष सोबत येत नाही. त्यातच आज भाजपने स्नेहा मेहुल पाटील यांना महापौरपदाचे उमेदवार घोषित केले. त्यामुळे मी सेक्युलर सोबत जाणार, अशी प्रतिक्रिया नारायण चौधरी यांनी दिली होती. त्यानंतर, ते काँग्रेससोबत गेल्याने भिवंडी महापालिकेत चांगलंच सत्तानाट्य पाहायला मिळालं. 

भिवंडीत भाजप नगरसेवकांत फूट

भिवंडीतल्या भाजपच्या नगरसेवकांमध्ये फाटाफूट झाली असून भाजपचा एक गट नारायण चौधरींच्या विरोधात गेला आहे. नारायण चौधरी काँग्रेससोबत गेल्यानं भाजपचा एक गट नाराज झाल्याची माहिती आहे. नारायण चौधरी हे भाजपचे अधिकृत महापौरपदाचे उमेदवार तर स्नेहा पाटील ह्या डमी उमेदवार असल्याचा आरोप करत नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे.  तसेच, नारायण चौधरी यांची काँग्रेससोबत जाण्याची खेळी असल्याने भाजपचे नगरसेवक नाराज आहेत.

महायुतीकडे 34 नगरसेवक, भाजपचे 9 फुटले

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीकडे मिळून 34 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी त्यांना कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी आणि समाजवादी पक्षाच्या मदतीची आवश्यकता आहे. हे सर्व घटक एकत्र आल्यास महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते. मात्र, महायुतीतही महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद उफाळून आले आहेत. त्यामुळे आज दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे. 

भिवंडीत 90 पैकी कोणाला किती जागा? बहुमताचा आकडा 46

काँग्रेस – 30 जागा
भाजप – 22 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस – 12 जागा
शिवसेना – 12 जागा
समाजवादी पक्ष – 6 जागा
कोणार्क विकास आघाडी – 4 जागा
भिवंडी विकास आघाडी – 3 जागा
अपक्ष – 1 जागा

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget