एक्स्प्लोर

सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अजित पवारांच्या आवाजात एआय व्हिडिओ बनवणाऱ्यांना थेट इशारा दिलाय. 

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) दिवंगत नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन राष्ट्रवादीतील तणाव वाढत असून आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोपांतून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेतून त्यांनी थेट अजित पवारांचे (Ajit Pawar) विमान मुद्दाम पाडलं, असा गंभीर आरोप करत व्हीएसआर कंपनीवर शंका उपस्थित केल्या. तर, दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट करत अजित पवारांच्या निधनानंतर एआय व्हिडिओ बनवणाऱ्या मुलांचे कौतुक केले होते. AI इंजिनिअर (AI) तरुणांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, असे म्हणत काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. आता, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अजित पवारांच्या आवाजात एआय व्हिडिओ बनवणाऱ्यांना थेट इशारा दिलाय. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या आवाजातील व प्रतिमेतील एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या बनावट चित्रफिती व ध्वनिफिती समाजमाध्यमे तसेच विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही व्यक्ती स्वार्थी राजकीय व सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी आदरणीय दादांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी वक्तव्ये पसरवत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. दादांबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अपार आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना आहे. त्या भावनेचा गैरफायदा घेऊन जनतेमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न आहे. अशा प्रकारे दिवंगत नेत्याच्या प्रतिमेचा वापर करणे हे अत्यंत हीन आणि निषेधार्ह कृत्य आहे, असे म्हणत सुनिल तटकरे यांनी नाव न घेता रोहित पवार यांनाच लक्ष्य केलयं. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्पष्टपणे इशारा देतो की, संबंधित व्यक्तींनी अशा एआय-निर्मित बनावट चित्रफिती व ध्वनिफितींचे प्रसारण तात्काळ थांबवावे. अन्यथा संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सायबर कायद्यांनुसार व अन्य लागू कायद्यांनुसार गुन्हे नोंदवून दोषींना शिक्षा व्हावी यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. तसेच, जनतेला व सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की, अशा कोणत्याही संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप्स पुढे पाठवू नयेत, प्रसारित करू नयेत आणि त्यावर विश्वास ठेवू नये. सत्यतेची खात्री न करता कोणतीही माहिती शेअर करणे टाळावे, असे इशाराही दिला. 

कायदेशीर कारवाई होईल 

दिवंगत अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने असत्य प्रचार करणे हे समाजहिताला बाधक असून लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा सर्व कृत्यांचा तीव्र निषेध करीत असून संबंधितांनी तात्काळ हे प्रकार बंद करावेत, अन्यथा कडक कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, याची नोंद घ्यावी, असेही तटकरे यांनी म्हटले. 

रोहित पवारांनी केलं होतं कौतुक

दरम्यान, रोहित पवार यांनी एआय व्हिडिओ बनवणाऱ्यांचं कौतुक करताना म्हटले होती की, AI इंजिनिअर तरुणांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अजितदादा गेल्यावर जगाला जसे गिधाडांची वृत्ती दिसली तसं सामाजिक भान जपणारी तरुणाईही दिसली. या तरुणांनी एक आदर्श घालून दिला. खूप खूप कौतुक..! असे म्हणत रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर केला होता. 

हेही वाचा

माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक लो', रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?

Embed widget