Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
शिवजयंतीनिमित्त जुन्नर भागात 'हिंदवी स्वराज्य महोत्सव' सुरू झाला आहे. यानिमित्त दोन दिवस भव्य बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं.. या निमित्तानं राज्यभरातील चारशे बैलगाडा मालक सहभागी झालेत.. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी नऊ वाजता किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थिती राहणार आहेत. या निमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय..
नाशिकमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती सेनेच्या वतीनं भव्य देखावा साकारण्यात आलाय.. महाराजांच्या शौर्याचे आणि राज्यकारभारातील वैभवाचे प्रतीक असलेल्या विविध ऐतिहासिक वस्तूंच्या प्रतिकृती यंदाही सादर करण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षी खास आकर्षण ठरतंय ते म्हणजे अजिंक्य किल्ल्यावर महाराजांनी वापरलेल्या राजगादीची प्रतिकृती.. याच राजगादीवरून महाराजांनी न्यायनिवाडा करत स्वराज्याची धुरा सांभाळली होती, असा ऐतिहासिक संदर्भ मानला जातो. त्या राजगादीची सुबक आणि भव्य प्रतिकृती साकारून शिवभक्तांसमोर इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


















