Xiaomi ने एकसोबत लॉन्च केले दोन लॅपटॉप, लूकपासून प्रोसेसरपर्यंत जाणून घ्या सर्व काही
Xiaomi NoteBook Pro 120 Series: Xiaomi ने एकाच वेळी भारतात दोन नवीन लॅपटॉप लॉन्च केले आहेत. ज्यात Xiaomi Notebook Pro 120G आणि Xiaomi Notebook Pro 120 यांचा समावेश आहे.
Xiaomi NoteBook Pro 120 Series: Xiaomi ने एकाच वेळी भारतात दोन नवीन लॅपटॉप लॉन्च केले आहेत. ज्यात Xiaomi Notebook Pro 120G आणि Xiaomi Notebook Pro 120 यांचा समावेश आहे. या लॅपटॉपमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि अॅल्युमिनियम अलॉय बॉडी फिनिश डिझाइनसह 14-इंच स्क्रीन आहे. लॅपटॉपमध्ये 12th Gen Intel Core i5 H-सिरीज प्रोसेसर आहे. यासोबतच लॅपटॉपमध्ये 56Whr बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्टही उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.
Xiaomi Notebook Pro 120G चे स्पेसिफिकेशन
Xiaomi Notebook Pro 120G लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा Mi-TrueLife डिस्प्ले आहे. जो 2.5K रिझोल्यूशन आणि 16:10 आस्पेक्ट रेशोसह येतो. या लॅपटॉपमध्ये Windows 11 सह 12th Gen Intel Core i5 H-सिरीज प्रोसेसर आणि Nvidia GeForce MX550 ग्राफिक्स कार्ड आहे. तसेच यात 16 GB LPDDR5 RAM + 512 GB PCIe Gen 4 स्टोरेज देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी हा लॅपटॉप ड्युअल-बँड वाय-फाय 6, ब्लूटूथ v5.2, थंडरबोल्ट 4 पोर्ट, HDMI 2.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट, यूएसबी टाइप-ए पोर्ट आणि 3.5 मिमी कॉम्बो हेडफोन जॅकला सपोर्ट करतो. यासोबतच यामध्ये 2W स्टीरिओ स्पीकर देखील देण्यात आले आहेत.
Xiaomi Notebook Pro 120 चे स्पेसिफिकेशन
Xiaomi Notebook Pro 120 लॅपटॉपला Xiaomi Notebook Pro 120G चे लाईट व्हर्जन म्हणता येईल. Xiaomi Notebook Pro 120 मध्ये 2.5K रिझोल्यूशनसह 14-इंचाचा Mi-TrueLife डिस्प्ले देखील आहे. यामध्ये 12th Gen Intel Core i5 H-सिरीज प्रोसेसर देखील आहे. या लॅपटॉपमध्ये Intel UHD ग्राफिक्स कार्ड उपलब्ध आहे. या लॅपटॉपमध्ये Notebook Pro 120G चे सर्व पोर्ट देखील देण्यात आले आहेत.
Xiaomi Notebook Pro 120G आणि Notebook Pro 120 किंमत
Xiaomi Notebook Pro 120G आणि Notebook Pro 120 एकाच सिल्व्हर कलरमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. Xiaomi Notebook Pro 120G ची किंमत 74,999 रुपये आणि Notebook Pro 120 ची किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे लॅपटॉप कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon India वरून सहज खरेदी करता येतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- VI 5G Service: Jio आणि Airtel नंतर आता Vodafone-Idea ही देणार 5G सेवा? कंपनी लवकरच करू शकते घोषणा
- Google Meet : गुगल मीटचं नवं फिचर, म्युट किंवा अनम्युट करण्यासाठी करा स्पेसबारचा वापर