एक्स्प्लोर
11 सप्टेंबरला शाओमी Mi Mix2 स्मार्टफोनचं लाँचिंग
आयफोन 8 स्मार्टफोन लाँचिंगच्या एक दिवस आधीच शाओमी आपला नवा स्मार्टफोन Mi Mix2 लाँच करणार आहे.
मुंबई : शाओमी आपला नवा स्मार्टफोन Mi Mix2 11 सप्टेंबरला लाँच करणार आहे. 12 सप्टेंबरला अॅपलचा आयफोन 8 लाँच होणार असल्यानं त्याच्या एक दिवस आधी शाओमी आपला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
लीक रिपोर्टनुसार, Mi Mix2 मध्ये 6.4 इंच स्क्रीन असणार आहे. तसेच यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर असणार आहे. तसेच यामध्ये 6 जीबी रॅम असण्याची शक्यता आहे. तर यामध्ये इंटरनल मेमरी 256 जीबीपर्यंत असू शकते.
या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल ड्यूल रिअर कॅमेरा तर 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे. त्यामुळे फोटो चाहत्यांसाठी हा स्मार्टफोन खास पर्वणी ठरु शकतो.
Mi Mix2 या स्मार्टफोनची किंमत 3,999 युआन (जवळजवळ 33,949 रु) असण्याची शक्यता आहे. भारतात हा स्मार्टफोन कधी लाँच होणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement