एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
5 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंतचे कर्ज; शाओमी कंपनीची ऑफर
शाओमी कंपनीने एमआय क्रेडिट सेवा लॉन्च केली आहे. याद्वारे अवघ्या 5 मिनिटांत तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. ज्या ग्राहकांना तत्काळ कर्जाची आवश्यकता असते अशा ग्राहकांसाठी शाओमीने एमआय क्रेडिट सेवा लॉन्च केली आहे.
मुंबई : चीनी स्मार्टफोन बनवणारी कंपनी शाओमीने भारतातील आपल्या ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज(पर्सनल लोन)देण्याचा निर्णय घेतला आहे. एमआय क्रेडिट सर्व्हीसच्या माध्यमातून ग्राहकांना अवघ्या 5 मिनिटांत तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. हे कर्ज महिन्याच्या हप्त्यांमध्ये फेडता येणार आहे. या सुविधेसाठी शाओमीने इंस्टंट लोन देणारी कंपनी KrazyBee सोबत हातमिळवणी केली आहे.
एमआय क्रेडिटसाठी आदित्य बिर्ला कॅपिटल पर्सनल फायनान्स, मनी व्ह्यू, अर्लीसॅलरी, क्रेडिटविद्या आणि झेस्टमनी हे कर्ज देणारे भागीदार आहेत. कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मिनिटांपेक्षा जास्त नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. शियाओमीनेही ही प्रक्रिया शंभर टक्के डिजिटल असल्याचे म्हटले आहे. वापरकर्त्यांना अॅपवर विनामूल्य क्रेडिट स्कोअर देखील मिळणार आहे.
असा करा अर्ज - कर्ज घेण्यासाठी वापरकर्त्यास गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन एमआय क्रेडिट अॅप डाउनलोड करावा लागेल. अॅपला आवश्यक परवानग्या दिल्यानंतर, 'गेट नाउ' बटणावर क्लिक करा आणि फोन नंबर प्रविष्ट करा आणि लॉगिन करा. येथे वापरकर्त्याला त्याची सर्व माहिती भरावी लागेल. यानंतर वापरकर्त्याला पॅनकार्डचा फोटो तसेच नाव, लिंग आणि जन्मतारखेची माहिती अपलोड करावी लागेल. यानंतर वापरकर्त्याला अॅड्रेस प्रूफ आणि सेल्फी अपलोड करावे लागतील. कंपनीच्या पात्रतेनुसार किती कर्ज दिले जात आहे, याची माहिती स्क्रीनवर दिसेल. कंपनी वैयक्तिक कर्जावर दर महिन्याला 1.35 इंटरेस्ट इतका शुल्क आहे. हे कर्ज तुम्ही 91 दिवसे ते 3 वर्षांच्या कालावधीत फेडू शकता. डेटा प्रायव्हसीचा चिंता - शाओमीच्या डेटा प्राव्हसीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शियोमीने आपल्या माध्यमातून नवीन लोन प्रणाली लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फक्त फोनवरुन एक प्रोफाइल बनवलं की, लगेच लोन मिळणार आहे. दरम्यान, ज्यावेळी आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जातात, त्यावेळी साहजिकच डेटा सरंक्षणाचा प्रश्न उभा राहतो. मात्र, यावर ग्राहकांच्या डेटाची पूर्ण काळजी घेण्यात येणार असल्याचे शाओमीकडून सांगण्यात आले आहे. शाओमीने म्हटले आहे, की हा डेटा एन्क्रिप्टेड स्वरुपात संग्रहित केला जाईल. संबंधित बातम्या : - चार कोटी 70 लाखांच्या कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही, रितेश देशमुखचं स्पष्टीकरण आस्मानी संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी जाच - धनंजय मुंडे शाओमीच्या नोट 5 प्रोसह इतर फोनवर भरघोस ऑफरHere's introducing #MiCredit a curated marketplace for lenders.
- 100% Digital - Apply for loan in 5 minutes - High success rate, higher loan amount, low interest rate - Free Credit Score - Encrypted data locally stored Get it on @googleplay and GetApps #MoneyWhenYouNeedIt pic.twitter.com/jc1oAqOn9k — Mi Money (@MoneyWithMi) December 3, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement