एक्स्प्लोर
शाओमीचा Mi 5S प्लस स्मार्टफोन लाँच, पाहा फीचर आणि किंमत

मुंबई: स्मार्टफोन कंपनी शाओमीनं मंगळवारी चीनची राजधानी बीजिंगमध्ये Mi 5 S सोबत Mi 5 S प्लस देखील लाँच केला आहे. Mi 5 Sची किंमत जवळजवळ 20000 रु. आहे. तर Mi 5 S प्लसची किंमत जवळजवळ 22,900 रु. आहे. शाओमीचा नवा स्मार्टफोन Mi 5 Sच्या 3 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 1,999 चीनी युआन (जवळजवळ 20,000) रु. आहे. तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 2,299 युआन (22,900 रु.) आहे. तर शाओमीचा दुसरा स्मार्टफोन Mi 5 Sप्लस 4 जीबी आणि 67 जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 2,299 युआन (22,900 रु.) आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 2,599 युआन (26,000 रु.) आहे. Mi 5 S स्मार्टफोनचे खास फीचर: 5.15 इंच फूल एचडी 1080x1920 पिक्सल डिस्प्ले 2.15 गीगाहर्त्झ स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर अल्ट्रा एलईडी लाइट 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 4 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर 4जी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि जीपीएस Mi 5 S प्लस स्मार्टफोनचे खास फीचर: 5.7 इंच फूल एचडी डिस्प्ले 2.35 गीगाहर्त्झ स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर अल्ट्रा एलईडी लाइट 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 4 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर 4जी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि जीपीएस
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
महाराष्ट्र






















