एक्स्प्लोर
Advertisement
‘वर्ल्ड सोशल मीडिया डे’ : सुदर्शन पटनाईकांचं आकर्षक वाळूचित्र
व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर यांसारख्या माध्यमांमुळे जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला आहे. आज सोशल मीडियाच्या नजरेतूनच आपण जगाकडे पाहू लागलो आहोत. पटनाईक यांनी आपल्या शिल्पाच्या माध्यमातून नेमकं याच गोष्टीवर भाष्य केलं आहे.
मुंबई : ‘वर्ल्ड सोशल मीडिया डे’ आज जगभरात साजरा होत आहे. यानिमित्तच सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी एक आकर्षक वाळूशिल्प तयार केलं आहे. या वाळूशिल्पात डोळ्याच्या आकारामध्ये विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दाखवण्यात आले आहेत.
व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर यांसारख्या माध्यमांमुळे जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला आहे. आज सोशल मीडियाच्या नजरेतूनच आपण जगाकडे पाहू लागलो आहोत. पटनाईक यांनी आपल्या शिल्पाच्या माध्यमातून नेमकं याच गोष्टीवर भाष्य केलं आहे.
अलिकडच्या काळात सर्वांच्याच आयुष्यात सोशल मीडियाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच व्हॉट्सअप मेसेजेस पाहत होते. या आभासी विश्वाचे खऱ्या आयुष्यावर मोठे परिणाम होत आहेत. म्हणूनच ‘वर्ल्ड सोशल मीडिया डे’च्या निमित्ताने सोशल मीडियाच्या चांगल्या आणि वाईट बाजूंवरही चर्चा होत आहे.Social media has become an inseparable part of our lives. My SandArt for the occasion at #Puri beach, #Odisha. #HappySocialMediaDay pic.twitter.com/oGi7TeRInM
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) June 30, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement