एक्स्प्लोर
WhatsAppचं जुनं 'स्टेटस' फीचर पुन्हा सुरु झालं!

मुंबई: व्हॉट्सअॅपनं पुन्हा एकदा आपलं जुनं स्टेटस फीचर सुरु केलं आहे. नवं स्टेट्स फीचर अनेक यूजर्सच्या पसंतीस उतरलं नव्हतं. त्यामुळे व्हॉट्सअॅपनं जुनं स्टेटस फीचर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. आता जुनं स्टेटस फीचर रोल आऊट होणं सुरु झालं आहे. व्हॉट्सअॅपनं आपल्या 8व्या वर्षपूर्तीनिमित्त नवं स्टेटस फीचर सुरु केलं होतं. पण व्हॉट्सअॅपच्या अनेक यूजर्सनं याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे व्हॉट्सअॅपनं देखील आपला निर्णय बदलला. अँड्रॉईड यूजर्संना अपडेट मिळणं सुरु झालं आहे. या फिचरला नाव मात्र About देण्यात आलं आहे. जुनं फीचर v2.17.107 अपडेटसह वापरलं जाऊ शकतं.
कसं सुरु कराल जुनं स्टेटस फीचर? जुनं स्टेट्स फीचर सुरु करण्यासाठी यूजर्सला सेटिंग मेन्यू जावं लागेल. त्यानंतर प्रोफाइल फोटोच्या खाली तुम्हाला तुमचं स्टेटस दिसेल. त्यावर करुन यूर्जस स्टेटस बदलू अथवा एडिट करु शकतो. पूर्वीप्रमाणे तुम्हाला इथं Available, Busy, At school, At the movie. हे ऑप्शन दिसतील. दरम्यान, जुन्या स्टेट्ससोबत तुम्हाला नवं स्टेट्स फीचरही सुरु ठेवता येईल. त्यामुळे यूजर्सला हवं असलेलं फीचर तो निवडू शकतो. संबंधित बातम्या: व्हॉट्सअॅपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर परतणार, नाव असेल...
कसं सुरु कराल जुनं स्टेटस फीचर? जुनं स्टेट्स फीचर सुरु करण्यासाठी यूजर्सला सेटिंग मेन्यू जावं लागेल. त्यानंतर प्रोफाइल फोटोच्या खाली तुम्हाला तुमचं स्टेटस दिसेल. त्यावर करुन यूर्जस स्टेटस बदलू अथवा एडिट करु शकतो. पूर्वीप्रमाणे तुम्हाला इथं Available, Busy, At school, At the movie. हे ऑप्शन दिसतील. दरम्यान, जुन्या स्टेट्ससोबत तुम्हाला नवं स्टेट्स फीचरही सुरु ठेवता येईल. त्यामुळे यूजर्सला हवं असलेलं फीचर तो निवडू शकतो. संबंधित बातम्या: व्हॉट्सअॅपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर परतणार, नाव असेल... आणखी वाचा























