WhatsApp डेस्कटॉप लॉगइन होणार आणखी सुरक्षित; फक्त QR Code पुरेसा नाही
WhatsApp च्या डेस्कटॉप लॉगइनसाठी आतापर्यंत फक्त QR Codeचा वापर केला जात होता. पण, आता सुरक्षिततेच्या दृष्टीनं घेण्यात आलेल्या निर्णयाअंतर्गत आणखी एका पायरीला युजर्सना सामोरं जावं लागणार आहे.
नवी दिल्ली : लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या आणि सर्वाधिक वापरात असणाऱ्या व्हॉट्सअप या मेसेजिंग अॅपच्या गोपनीयता धोरणाची बरीच चर्चा मागील काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली होती. त्यातच आता या अॅपमधील आणखी एका अपडेटनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ही अपडेट अॅपच्या डेस्कटॉप लॉगइनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. ही अपडेट आहे WhatsApp Web च्या लॉगइन संदर्भातली. QR Code पुरेसा नाही
फेसबुकच्या कोट्यवधी युजर्सच्या डेटापर्यंत पोहचले हॅकर्स; Telegram ला बनवले हत्यार
व्हॉट्सअपकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार युजर्सना आता डेस्कटॉपवर लॉगइन करतेवेळी क्यूआर कोडचा वापर करण्यापूर्वी फेस प्रिंट किंवा फिंगरप्रिंट अनलॉकचा वापर करावा लागणार आहे. आतापर्यंत यासाठी फक्त क्यूआर कोडचाच वापर करण्यात येत होता.
कसं वापरु शकाल हे फिचर?
WhatsApp वेब अथवा व्हॉट्यस अप डेस्कटॉपमध्ये अकाऊंट लिंग करण्यासाठी सर्वप्रथम WhatsApp सुरु करा.
त्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात दिलेल्या तीन ठिपके असणाऱ्या चिन्हावर क्लिक करुन सेटींग्ज मध्ये जा.
त्यामध्ये व्हॉट्सअप वेब अथवा डेस्कटॉपवर क्लिक करा.
तिथं Link a Device या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर पुढील प्रक्रिया फोनच्या बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनला फॉलो करा.
लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर जर तुमचं अकाऊंट दुसऱ्या कोणत्या ठिकाणहून लॉगइन दिसलं तर ते तातडीनं लॉगआऊट करा.
एका वेळी अनेक डेस्कटॉपवर सुरु करता येणार व्हॉट्सअप
येत्या काही दिवसांमध्ये WhatsApp युजर्सना मल्टी डिवाइस लॉगइन फीचरही मिळण्याची चिन्हं आहेत. येत्या काळात युजर्स एकाच वेळी अनेक डेस्कटॉपवर एकच WhatsApp अकाउंट सुरु करु शकतात. सध्या मात्र एकाच डिवाइसवर लॉगइन करण्याची सुविधा उपलब्ध आहे.