(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WhatsApp: व्हॉट्सअॅपवर वापरा आकर्षक फॉन्ट, या सोप्या स्टेप्स फॉलो करा
WhatsApp Tips : आता व्हॉट्सअॅपवर वेगवेगळ्या फॉन्ट शैलींमध्ये आपल्याला मेसेज टाईप करता येऊ शकणार आहे. ती सोपी पद्धत काय आहे ते जाणून घ्या.
WhatsApp Trick: जेव्हा आपण काहीतरी लिहितो, तेव्हा ते शक्य तितकं स्टायलिश आणि सुंदर बनवण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यामुळे त्याचं वाचन अधिक सोपं होऊ शकेल. त्यासाठी आपण फॉन्टचे पर्याय वापरतो. असाच काही पर्याय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये उपलब्ध आहे.
लोकांना त्यांचे संदेश वेगवेगळ्या फॉन्ट आणि शैलींमध्ये व्हॉट्सअॅपवर लिहायचे असतात. बहुतेक लोकांना त्याचा वापर कसा करायचा याची कल्पना नसते. यूजर्स व्हॉट्सअॅपवर वेगवेगळ्या फॉन्टमध्ये सहज मेसेज लिहू शकतील असे काही पर्याय उपलब्ध आहेत.
अॅंड्रॉईड फोनसाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा,
- प्रथम मेसेज लिहा आणि नंतर तो सिलेक्ट करा. सिलेक्ट करण्यासाठी काही वेळ तो टॅप करुण ठेवा.
- त्यानंतर उजवीकडे वरच्या बाजूला दिसणार्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
- तुम्हाला बोल्ड, इटॅलिक, स्ट्राइक थ्रू आणि मोनोस्पेस असे पर्याय मिळतील.
- अशा प्रकारे तुम्ही तुमचा मेसेज स्टायलिश आणि वेगळं बनवू शकता.
या ऑप्शनमध्ये मेसेज पेस्ट करण्यासोबतच वेब सर्चची एक अप्रतिम सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच एखादा शब्द निवडल्यानंतर तो आधीप्रमाणे टॅप करा. तुमच्या समोर एक छोटा टॅब येईल. त्यामध्ये वेब सर्च असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून, तुम्ही ब्राउझरवर पोहोचाल. त्या ठिकाणी तुम्हाला निवडलेल्या शब्दाशी संबंधित माहिती मिळेल. आयफोनसाठी अशीच सेटिंग्ज वापरू शकता.
संबंधित बातम्या:
- Emoji : 2021 मधील 'या' इमोजी सर्वाधिक लोकप्रिय, जाणून घ्या त्यामागील अर्थ
- WhatsApp वरून बँक अकाऊंट कसं डिलीट कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
- Red Heart Emoji : रेड हार्ट पाठवाल तर मिळेल मोठी शिक्षा, 'या' देशानं बनवला कायदा