एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, आता फोटो, व्हिडीओ स्टेटस अपलोड करा!
मुंबई : इन्स्टंट मोबाईल अॅप अर्थात व्हॉट्सअॅपचं नवं फीचर समोर आलं आहे. व्हिडीओ कॉलिंग, व्हिडीओ स्ट्रीमिंग, अॅनिमिटेड जीआयएफ इमेज यानंतर व्हॉट्सअॅप आता स्टेटस फीचरमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. WABetaInfo च्या माहितीनुसार,युझर व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये फोटो आणि व्हिडीओही शेअर करु शकतात.
व्हिडीओ कॉलिंग, व्हिडीओ स्ट्रीमिंग, अॅनिमिटेड जीआयएफ इमेज यानंतर व्हॉट्सअॅप आता स्टेटस फीचरमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. WABetaInfo च्या माहितीनुसार,युझर व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये फोटो आणि व्हिडीओही शेअर करु शकतात. व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये या नव्या फीचरची टेस्टिंगही सुरु झाली आहे.
आयफोनच्या बीटा व्हर्जनमध्येही हे फीचर उपलब्ध आहे. या फीचरमध्ये युझर फोटो किंवा व्हिडीओ क्लिप अपलोड करु शकतात, जे पुढील 24 तास दिसू शकेल. स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रावर हे फीचर आहे.
व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरसाठी अॅपमध्ये वेगळा टॅब दिला जाईल. जो सध्याच्या जनरल स्टेटस फीचरपेक्षा वेगळा असेल. हे एक्स्परिमेंटल फीचर स्टेटस टॅब चॅट आणि कॉल्सच्या मध्ये दिलं जाईल.
WABetaInfo ने या फीचरसंबंधी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. अॅप स्टोअरवर बीटा युजर 2.17.5 व्हर्जनवर तुम्हाला नवं फीचर मिळू शकतं. मात्र अधिकृतरित्या हे फीचर लॉन्च केलेलं नाही. त्यामुळे या नव्या फीचरसाठी तुम्हाला बीटा टेस्टर व्हावं लागेल.
नुकतंच व्हॉट्सअॅपमध्ये लोकेशन शेअरिंगचं फीचर अॅड झाल्याचं वृत्त होतं. WABetaInfo च्या माहितीनुसार, "लोकेशनची माहिती एक मिनिट, 2 मिनिटं, 5 मिनिटं किंवा अनिश्चित काळासाठी घेतली जाऊ शकते, असं फीचर कंपनी लवकरच आणण्याची शक्यता आहे."
तसंच काही दिवसांपूर्वीच मेसेज 'अनसेंड' आणि 'एडिट' करण्याचा ऑप्शन व्हॉट्सअॅप उपलब्ध होऊ शकतो, असं वृत्त होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जॅाब माझा
अहमदनगर
क्रीडा
Advertisement