Airtel Black Launch : तंत्रज्ञानातले 'हे' ट्रेंड आयुष्य सोपे बनवतात
Airtel Black Launch : कमी वेळात लोकांना व्हर्च्युअल स्पेसकडे वळवणं सोपं नव्हतं. उत्कृष्ट हार्डवेअर आणि कनेक्टिव्हिटीमुळे यूजर्ससाठी हा मार्ग सुलभ झाला आहे.
Airtel Black Launch : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून लोकं आता न्यू नॉर्मलप्रमाणे जगत आहेत. कोरोनाच्या कठीण काळात तंत्रज्ञान सर्वात उपयुक्त ठरले आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची, पालकांची कामाची पद्धत बदलली. एवढेच नव्हे तर लोकं कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत व्हर्च्युअल जोडले गेले. उत्कृष्ट हार्डवेअर आणि चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे यूजर्ससाठी हा मार्ग सुलभ झाला आहे. एका वर्षात अनेक नवीन ट्रेंड आले आहेत. त्यामुळे लोकांना न्यू नॉर्मल जगणं सोपं झालं.
हायब्रिड वर्किंग सोल्यूशन
लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे बहुतेक कंपन्यांनी घरातूनच काम करण्याचा अवलंब केला. ऑफिसच्या डेस्कची जागा घरातील टेबल-खूर्चीने घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारख्या सुविधेमुळे ऑफिसची टीम फक्त एकत्र काम न करता नवीन कल्पना, रणनीती आखत कामाच्या प्रगतीत वाढ करत होती. घरातून चांगले काम होत असल्याने अनेक कंपन्यांनी त्यांच्या यूजर्सला अनेक चांगल्या सुविधा देऊ केल्या. यात एअरटेलच्या 'एअरटेल ब्लॅक' या नव्या ऑफरचा समावेश होता.
डीटीएच, पोस्टपेड आणि फायबर कनेक्शन एकाच बिलात देण्याची, अशी ही ऑफर होती. याचा कंपन्यांना मोठा फायदा झाला. यामुळे अनेक बिलांच्या पेमेंटचा भार कमी होत होता. या ऑफर अंतर्गत कंपनीने आपल्या यूजर्ससाठी एक व्यवस्थापक टीम प्रदान केली. समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न या टीमच्या माध्यमातून केला जात होता.
त्रासमुक्त डिजिटलायझेशन
लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे यूजर्सला घरगुती वस्तू आणि औषधे खरेदी करण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळ्या पर्यायांचा वापर करावा लागला. त्यामुळे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, सुपरमार्केट, डिलिव्हरी अॅप्सची मागणी खूप वाढली आहे. लोकांच्या सवयी बलल्यामुळे स्थानिक किराणा दुकाने देखील ई-स्टोअर सारख्या पर्यायांचा वापर करू लागले. डिजीटल पेमेंट, नेट बॅंकिंग आणि UPI सारख्या गोष्टींचा वापर करणे अधिक सोयिस्कर झाले.
व्हिडिओ कॉल आणि टेलिफोनची महत्तवपूर्ण भूमिका
कोरोनाकाळात वैद्यकीय कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर होते. व्हिडिओ कॉल आणि टेलिफोनमुळे रुग्णालयांवरील ओझं कमी होण्यास मदत झाली. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषध वितरणाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही पद्धत रुग्ण आणि डॉक्टर दोघांसाठीही सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले.
ऑनलाइन गेमिंगच्या क्षेत्रात वाढ
लॉकडाऊनमुळे बाहेर जाऊन चित्रपट पाहणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळाले. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांना अनेक सुविधा दिल्या. मैदानी खेळ सोडून ऑनलाइन गेमिंगचा पर्याय निवडला गेला. भारतात ऑनलाइन गेमिंगची सरासरी वेळ प्रति तास 2.5 वरून 4.1 प्रति तास झाली आहे. चांगले स्मार्टफोन्स, चांगल्या स्पीडचे इंटरनेट यामुळे ऑनलाइन गेमिंगच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली.