एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ग्रुप अॅडमिनला व्हॉट्सअॅप आणखी अधिकार देणार!
व्हॉट्सअपचं हे नवं फीचर आल्यानंतर ग्रुपचा आयकॉन आणि नाव कुणी बदलायचं हे ठरवण्याचा अधिकार अॅडमिनला असेल.
मुंबई : व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमिनला आणखी अधिकार मिळणार आहेत. ग्रुपमधील कोणते सदस्य ग्रुपचं नाव आणि आयकॉन बदलू शकतात, हे आता ग्रुप तयार केलेला अॅडमिन ठरवू शकणार आहे.
WABetaInfo.com च्या वृत्तानुसार या फीचरची सध्या चाचणी सुरु आहे. 2.17.387 या अपडेटमध्ये हे नवं फीचर युझर्सना मिळणार आहे. व्हॉट्सअपचं हे नवं फीचर आल्यानंतर ग्रुपचा आयकॉन आणि नाव कुणी बदलायचं हे ठरवण्याचा अधिकार अॅडमिनला असेल.
https://twitter.com/WABetaInfo/status/921479307452612608
व्हॉट्सअॅपने गेल्या काही दिवसांपासून आकर्षक फीचर्सची घोषणा केली आहे. यामध्ये अनसेंड फीचर, ज्यावर सध्या काम सुरु आहे, शिवाय फोटो स्टेटस फीचर आणि नुकतीच घोषणा केलेलं लाईव्ह लोकेशन स्टेटस फीचर, अशा फीचर्सचा यामध्ये समावेश आहे.
लाईव्ह लोकेशन फीचर
व्हॉट्सअॅपच्या Live Location फीचरमुळे तुम्ही लोकेशन शेअर केला आणि तुमचा प्रवास सुरु असेल, तर तुमचं लाईव्ह लोकेशन कळू शकेल.
Live Location हे कोणालाही पर्सनल व्हॉट्सअॅप किंवा ग्रुपवर पाठवू शकता.
ठराविक काळासाठी हे फीचर काम करेल. काही वेळानंतर पुन्हा तुम्हाला लोकेशन शेअर करावं लागू शकतं.
हे फीचर कसं काम करतं?
यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅटमध्ये जाऊन, Attach वर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला लोकेशनचा पर्याय दिसेल तो निवडा. त्यानंतर तुम्हाला कालमर्यादा विचारली जाईल. यामध्ये 15 मिनिट, 1 तास आणि 8 तास असे पर्याय दिसतील, तो आपल्या सोईनुसार निवडा.
लाईव्ह लोकेशन तुम्ही म्यॅनुअली बंद करु शकता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement