एक्स्प्लोर
व्होडाफोनचा धमाका, अवघ्या 29 रुपयात अनलिमिटेड डेटा!
मुंबई: व्होडाफोननं आपल्या ग्राहकांसाठी एक नवा प्लान लाँच केला आहे. 'व्होडाफोन सुपरनाईट' हा प्लान प्रीपेड यूजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 29 रुपयात पाच तास अनलिमिटेड 3जी किंवा 4जी डेटा मिळणार आहे.
म्हणजेच या प्लानमध्ये अवघ्या 6 रुपयात तासाभरासाठी अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये मिळणारा डेटा तुम्ही रात्री 1 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड वापरु शकता.
व्होडाफोननं दिलेल्या माहितीनुसार, 'हा प्लान तुम्ही कधीही अॅक्टिव्हेट करु शकता. पण रात्री एकवाजेपासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत अनलिमिटेड इंटरनेट सर्फिंग करता येऊ शकतं.'
सुपरनाईट पॅक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना *444*4# डायल करावं लागेल. याशिवाय रिचार्ज शॉपमधूनही तुम्ही रिचार्ज करु शकतात. याआआधी व्होडाफोननं रमजान ऑफरमध्ये 2जी यूजर्ससाठी 5 रुपयात 1 तासासाठी अनलिमिटेड डेटा प्लान आणला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement