एक्स्प्लोर
जिओला टक्कर, व्होडाफोनचा केवळ 999 रुपयात फोन
व्होडाफोन-मायक्रोमॅक्सचा हा फोन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
![जिओला टक्कर, व्होडाफोनचा केवळ 999 रुपयात फोन Vodafone Micro Max Presents 4g Phone At Rupees 999 जिओला टक्कर, व्होडाफोनचा केवळ 999 रुपयात फोन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/24191602/vodafone-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोननेही मायक्रोमॅक्ससोबत मिळून 999 रुपयांचा फोन आणला आहे. भारत 2 अल्ट्रा असं या फोनचं नाव आहे. व्होडाफोन-मायक्रोमॅक्सचा हा फोन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
ग्राहकांना हा फोन खरेदी करण्यासाठी सुरुवातीला 2899 रुपये द्यावे लागतील. ज्यामध्ये 36 महिन्यांनंतर 1999 रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल. कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला 36 महिने सलग 150 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. पहिल्या 18 महिन्यांनंतर 999 रुपये कॅशबॅक दिला जाईल. तर 36 महिन्यांनी उर्वरित 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या 150 रुपयांमध्ये व्हॉईस कॉलिंग आणि डेटा मिळेल.
मायक्रोमॅक्स अल्ट्रा 2 चे फीचर्स
![जिओला टक्कर, व्होडाफोनचा केवळ 999 रुपयात फोन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/24191618/6110.jpg)
- अँड्रॉईड 6.0 मार्शमॅलो
- 4 इंच आकाराची स्क्रीन
- 1.3GHz प्रोसेसर
- 512 MB रॅम
- 4GB इंटर्नल स्टोरेज
- 2.0 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 0.3 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 1300mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)