एक्स्प्लोर
अखेर सर्वांचं आवडतं किकॅस टोरंट बंद

नवी दिल्लीः जगभरातील चाहत्यांची आवडती साईड किकॅस टोरंटवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेने ही कारवाई केली आहे. टोरंटचा सर्वेसर्वा अर्टेम व्हॉलीन याला पोलंडमधून अटक करण्यात आली असून टोरंटचे सर्व डोमेन्स जप्त केले आहेत. कॉपी राईट असणारे अनेक गाणी, चित्रपट, अप्लीकेशन्स टोरंटद्वारे नेटीझन्सला वितरीत केले जात होते. यामुळे जवळपास साडे सहा हजार कोटींचं नुकसान झालं असल्याचा दावा, शिकागो येथील जिल्हा न्यायालयात करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीनंतरच ही कारवाई करण्यात आली. व्हॉलीन उर्फ टीर्म याने 2008 साली किकॅस टोरंटची सुरुवात केली, असं बोललं जातं. या माध्यमातून पैशांची मोठी अफरातफर केली जात असे. अनेक सर्व्हरचा किकॅस टोरेंटशी टाएप होता, ज्यामध्ये शिकागो येथील एका सर्व्हरचाही समावेश आहे. या सर्व्हर विरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यामुळेच टोरेंटवर बंदी घालण्यात आली. टोरंट ही जगभरातील प्रसिद्ध वेबसाईटपैकी एक आहे. त्यामुळे हा नेटीझन्ससाठी मोठा झटका मानला जात आहे. गुन्हेगारी तक्रारीनुसार टोरंट ही जगातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या वेबसाईटच्या यादीत 69 व्या स्थानी आहे.
आणखी वाचा























