एक्स्प्लोर
'आधार'संदर्भातील बनावट वेबसाईट, अॅपवर UIDAI ची कारवाई
नवी दिल्ली: तुम्ही जर तुमचं आधार कार्ड तयार करणार असाल, तर जरा सावधान. कारण सध्या बाजारात काही बोगस साईटचा सुळसुळाट आहे, जे तुमच्याकडून बक्कळ पैसे उखळून आधार संदर्भातील सर्व सेवा देण्याचा दावा करत आहेत. आणि त्याद्वारे तुमची सर्व माहिती जाणून घेत आहेत. The Unique Identification Authority of India (UIDAI)ने अशा वेबसाईट आणि अॅपवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
UIDAI ने अशा भुलथापा देऊन ग्राहकांना गंडा घालणाऱ्या 12 वेबसाईट आणि 12 मोबाईल अॅप बंद केले आहेत. यूआयडीआयने दिलेल्या माहितीनुसार, गूगल प्ले स्टोअर्सच्या माध्यमातून अशा बोगस वेबसाईट आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून आधार कार्ड डाऊनलोड करुन देणे, आधार कार्ड तयार करणे, पीवीसी आधार कार्ड तयार करण्यासारख्या सुविधा देत आहेत. यातून हे वेबसाईट चालक ग्राहकांना बोगस आधार नंबर देऊन त्यांची माहिती मिळवत आहेत.
यासंदर्भात यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अजय भूषण पांडे यांनी सांगितले की, ''यूआयडीएआयने मोबाईल अॅप्लिकेशन किंवा अशा कोणत्याही वेबसाईट चालकाला आधार कार्ड तयार करुन देण्याची परवानगी दिलेली नाही. आधारसंदर्भातील सर्व प्रकारची माहिती मिळवण्यासाठी घटनेतील आधार अधिनियम-2016 या कलमाचा वापर करता येतो. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस कलम 38(7) अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागते.''
त्यामुळे सध्या अशाप्रकारे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जात आहे. तसेच जे लोक आधार कार्डच्या लोगोचा गैरवापर करत आहेत, त्यांच्यावरही कॉपीराईटच्या उल्लंघन केले जात आहे.
त्यामुळे अशा वेबसाईटला बळी पडू नये, असे आवाहन यूआयडीएआयच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच ज्या ग्राहकांना आपल्या आधार कार्डसंदर्भातील सर्व माहिती यूआयडीआयच्या अधिकृत वेबसाईच UIDAI.in वरच मिळू शकते असेही सांगितलं आहे. याशिवाय इतर वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशन बोगस असल्याचे यूआयडीएआयने सांगितले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement