एक्स्प्लोर
... म्हणून गॅलक्सी नोट 7 मध्ये बॅटरी स्फोट : सॅमसंग

नवी दिल्ली : सॅमसंग गॅलक्सी नोट 7 मधील दोष आणि अंतर्गत कारणांमुळे बॅटरी स्फोटाची समस्या उद्भवली, असं स्पष्टीकरण सॅमसंगने एका जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिलं आहे. इंटर्नल शॉर्ट-सर्किटची समस्या देखील याचं एक कारण असल्याचं सॅमसंगने स्पष्ट केलं आहे. भविष्यात अशा प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी समस्यांचं निराकरण करण्यात आलं असून बॅटरीची गुणवत्ताही वाढवण्यात आली आहे. तसेच यापुढे दुर्घटना टाळण्यासाठी बॅटरींची 8 प्रकारे सुरक्षा तपासणी करण्यात येईल, असंही सॅमसंगने म्हटलं आहे. गॅलक्सी नोट 7 च्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना मागील वर्षात समोर आल्या होत्या. त्यानंतर अनेक देशांमध्ये या फोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सॅमसंगने या फोनची निर्मितीही बंद केली होती. संबंधित बातम्या :
सॅमसंगने गॅलक्सी नोट 7 चं उत्पादन थांबवलं
इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात गॅलक्सी नोट 2 ला आग
सॅमसंग 'गॅलक्सी नोट 7' स्मार्टफोन बदलून देण्यास सुरुवात
सॅमसंग गॅलक्सी नोट 7 चा खिशात स्फोट, कंपनीवर खटला
सॅमसंग गॅलक्सी नोट 7 वर बाजारात बंदी, अमेरिका सरकारची घोषणा
सॅमसंग गॅलक्सी नोट 7 सह विमान प्रवासाला मनाई
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























