एक्स्प्लोर
ट्विटर अधिक सुटसुटीत, फोटो आणि लिंक्स कॅरेक्टर लिमिटमधून वगळल्या
मुंबई : जगभरातल्या कोट्यवधी यूजर्सना ट्विटर लवकरच एक खुशखबर देणार आहे. युजर्स आपल्या 140 कॅरेक्टरच्या ट्वीटमध्ये जोडत असलेले फोटो आणि लिंक कॅरेक्टर लिमिटमधून लवकरच वगळल्या जाणार आहेत.
यूजर्स आता ट्विटरवर कितीही फोटो किंवा मोठी यूआरएल लिंक शेअर करु शकतील आणि पुन्हा 140 कॅरेक्टरचा पूर्ण ट्वीटही टाईप करुन शेअर करु शकतील.
म्हणजेच ट्विटरवर फोटो किंवा लिंक्स शेअर करणाऱ्या यूजर्सना आता पूर्ण लांबीचा म्हणजे 140 कॅरेक्टरचा ट्वीट शेअर करता येणार आहे. या आधी यूजर्स जेव्हा फोटो किंवा लिंक्स शेअर करायचे तेव्हा मूळ 140 कॅरेक्टर मर्यादेतून फोटो आणि लिंक्ससाठी लागणारे कॅरेक्टर वजा होत असत.
ट्विटरने स्वतःहून लिंक शॉर्ट (छोट्या) केल्या तरी किमान 23 कॅरेक्टर त्यासाठी वापरले जात असत. म्हणजेच युजर्सला आपला ट्वीट 117 कॅरेक्टर्समध्येच संपवावा लागत होता.
ट्विटरमध्ये लवकरच येऊ घातलेल्या नव्या अपडेटनुसार तुम्ही फोटो किंला लिंक्स शेअर केल्या तरी तुम्हाला पूर्ण 140 कॅरेक्टरचा ट्वीट शेअर करता येणार आहे.
ट्विटरकडून अधिकृतपणे या अपडेटविषयी अजून कसलंही सूतोवाच करण्यात आलं नसलं तरी ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने त्याबाबतच वृत्त ट्विटरमधील विश्वासार्ह सुत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केलं आहे.
गेल्या वर्षीच ट्विटरने डायरेक्ट मेसेजची कॅरेक्टर लिमिट 140 कॅरेक्टर्सवरुन दहा हजार कॅरेक्टर्सपर्यंत केली होती. त्याचवेळी ट्विटर मेसेजची 140 कॅरेक्टर्स ही लिमिटही 10 हजारपर्यंत वाढवण्याची योजना होती, मात्र सध्या ट्विटर वापरणारांच्या तीव्र विरोधानंतर ट्विटरने हा विचार सोडून दिला.
ट्विटर सध्या वेगवेगळ्या उपायांनी जास्तीत जास्त यूजर्स जोडण्याचा प्रयत्न करत आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंगला युजर्सचा अजून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. ट्विटरला असलेली 140 कॅरेक्टर लिमिटची मर्यादा हेच ट्विटरचं बलस्थान असल्याचं अनेक जाणकारांना वाटतं.
सध्या जगभरातील 310 दशलक्ष म्हणजेच 31 कोटी युजर्स ट्विटर वापरतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement