Twitter's New Rule : यूजर्सच्या संमतीशिवाय फोटो, व्हिडीओ शेअर करण्याला बंदी, ट्विटरचा नवा नियम
Twitter's New Rule : ट्विटर वापरकर्त्यांना अन्य वापरकर्त्याच्या संमतीशिवाय त्यांचे खाजगी फोटो, व्हिडीओ शेअर करण्याला बंधनं घालण्यात आली आहेत.
Twitter's New Rule : ट्विटरला नवे सीईओ मिळाल्यानंतर लगेच काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ट्विटर वापरकर्त्यांना अन्य वापरकर्त्याच्या संमतीशिवाय त्यांचे खाजगी फोटो, व्हिडीओ शेअर करण्याला बंधनं घालण्यात आली आहेत. नवीन नियमांनुसार, यूजरच्या परवानगीशिवाय अन्य लोकं त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करु शकणार नाहीत. शोषण विरोधी धोरणाला अधिक मजबूत करण्यासाठी ट्विटरनं हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.
Beginning today, we will not allow the sharing of private media, such as images or videos of private individuals without their consent. Publishing people's private info is also prohibited under the policy, as is threatening or incentivizing others to do so.https://t.co/7EXvXdwegG
— Twitter Safety (@TwitterSafety) November 30, 2021
Sharing images is an important part of folks' experience on Twitter. People should have a choice in determining whether or not a photo is shared publicly. To that end we are expanding the scope of our Private Information Policy. 🧵
— Twitter Safety (@TwitterSafety) November 30, 2021
Twitter नं याबाबत अधिकृत माहिती देत म्हटलं आहे की, "नव्या नियमांच्या अंतर्गत जे लोकं पब्लिक फीगर नाहीत ते लोकं ट्विटरला त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ हटवण्याबाबत सांगू शकणार आहेत जे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय पोस्ट केले केले आहेत. ट्विटरनं म्हटलं आहे की, हे धोरण त्या लोकांसाठी नाही जे प्रसिद्ध व्यक्ती (Public Figure) आहेत. त्यांच्या ट्विट्सला सार्वजनिक हितासाठी शेअर केले जाऊ शकते.
ट्विटरच्या मते खाजगी फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यानं एखाद्या व्यक्तिच्या गोपनियतेचा भंग होऊ शकतो. त्यामुळं त्या व्यक्तिचं भावनिक किंवा शारिरीक नुकसान होऊ शकतं. कंपनीनं म्हटलं आहे की, खाजगी माध्यमांचा दुरुपयोग सर्वांनाच प्रभावित करु शकतो मात्र महिला कार्यकर्त्या, अल्पसंख्यांक समाजाच्या सदस्यांवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
या बातम्या देखील नक्की वाचा
Twitter New Features: ट्विटरचं पाखरु कलरफुल होणार! Twitterवर लवकरच मोठे बदल, 'हे' नवे फीचर्स येणार
Parag Agrawal salary : वय अवघं 37 वर्ष, ट्विटरच्या CEO पदी वर्णी, पराग अग्रवाल यांचा पगार किती?
'हा इंडियन सीईओ व्हायरस, यावर लस नाही'; पराग अग्रवाल यांच्यावर आनंद महिंद्रांची स्तुतीसुमनं