इंटरनेट कनेक्शन शिवाय 'टॅप टू पे' द्वारे करा सुरक्षित पेमेंट, PayTm ची ग्राहकांसाठी नवी सुविधा
डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमद्वारे पेमेंट करणे आता अधिक सोपं होणार आहे. कारण कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी 'टॅप टू पे' हे नवीन फीचर लॉन्च केले आहे.
PayTm : डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमद्वारे पेमेंट करणे आता अधिक सोपं होणार आहे. कारण कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी 'टॅप टू पे' हे नवीन फीचर लॉन्च केले आहे. या फीचर अंतर्गत वापरकर्ते त्यांच्या पेटीएम नोंदणीकृत कार्डद्वारे त्वरित पेमेंट करु शकतील आणि यासाठी युजर्सना त्यांचा फोन POS मशीनवर टॅप करावा लागेल. या नवीन फीचरची खास गोष्ट म्हणजे पेमेंट करण्यासाठी इंटरनेट कनेक्शनचीही गरज नाही. एवढेच नाही तर तुमचा फोन लॉक असला तरीही तुम्ही या फीचर द्वारे पेमेंट करू शकणार आहात..
'टॅप टू पे' सेवा (TAP TO PAY)
ही 'टॅप टू पे' सेवा Android तसेच iOS वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्याद्वारे Paytm ऑल-इन-वन पीओएस डिवाइस आणि इतर बँकांच्या POS मशीनद्वारे पेमेंट करू शकतात. पेटीएम अॅपवर सेव्ह केलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून वापरकर्ते 'टॅप टू पे' सेवा सहजपणे सक्रिय करू शकतात. पेटीएम अॅपवरील 'टॅप टू पे' पर्याय वापरण्याचा स्टेप्स या खालीलप्रमाणे आहेत :-
- कार्ड सूचीमधून योग्य कार्ड निवडा किंवा ‘टॅप टू पे’ होम स्क्रीनवर “Add New Card” वर क्लिक करा.
- पुढील स्क्रीन उघडल्यानंतर, त्यात आवश्यक कार्ड तपशील प्रविष्ट करा
- टॅप टू पे करण्यासाठी कार्ड जारीकर्त्याच्या सेवा अटी स्वीकारा.
- कार्डसोबत नोंदणीकृत तुमच्या मोबाईल नंबरवर (किंवा ईमेल आयडी) OTP पाठवला जाईल.
- ओटीपी भरल्यानंतर तुम्ही टॅप टू पे होम स्क्रीनच्या शीर्षस्थानी सक्रिय केलेले कार्ड पाहू शकता.
कार्डचे डिटेल्स सुरक्षित राहणार
पेटीएम सिलेक्टेड कार्डचा 16 अंकी प्राथमिक खाते क्रमांक (PAN) सुरक्षित व्यवहार कोड किंवा डिजिटल ओळख मध्ये रूपांतरित करते. याद्वारे कार्ड पेमेंट सुरक्षित आहे. यामध्ये युजरचे कार्ड डिटेल्स युजरकडे असतात आणि ते कोणत्याही थर्ड पार्टी पेमेंट प्रोसेसरसोबत शेअर केले जात नाहीत. रिटेल आउटलेटवर पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्याला त्याच्या कार्डचे तपशील कोणाशीही शेअर करण्याची आवश्यकता नाही आणि पीओएस उपकरणांद्वारे सहजपणे पेमेंट करू शकतो. याद्वारे, कार्ड मशीन्स असलेल्या सर्व रिटेल आउटलेटवर पेमेंट केले जाऊ शकते. पेटीएम अॅपवर समर्पित डॅशबोर्डद्वारे कार्ड व्यवस्थापित केले जाऊ शकते. डॅशबोर्डद्वारे, वापरकर्ते आवश्यकतेनुसार कार्ड बदलू किंवा डी-टोकनाइज करू शकतात.
संबंधित बातम्या:
- PayTM listing : शेअर बाजारात पेटीएमच्या 'Listing Loss'नंतर पुढे काय?
- PayTM पेटीएमच्या शेअर दरात घसरण का? 'ही' आहेत कारणे
- PayTM IPO पेटीएमच नव्हे तर या 10 कंपन्यांच्या IPO चा फुटला होता फुगा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha