एक्स्प्लोर
Shocking: ट्विटरच्या सहसंस्थापकाचंच ट्विटर हँडल हॅक
न्यूयॉर्क : गेल्या काही दिवसांत जगभरातील अनेक लोकप्रिय व्यक्तींचे ट्विटर अकाऊंट्स हॅक झाल्याचे समोर आले आहे. आता तर थेट ट्विटरचे सहसंस्थापक इव्हान विलियम्स यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे.
'मॅशेबल' वेबसाईटच्या वृत्तानुसार, 'आवरमाईन्स' नावाच्या एका समुहाने बुधवारी आपल्या एका ट्वीटमध्ये विलियम्स यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला आहे. मात्र, अवघ्या काही मिनिटांमध्येच हा ट्वीट डिलिट करण्यात आला.
या समुहाने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गचा अकाऊंटही हॅक केल्याचा दावा केला होता.
वारंवार हॅकिंगचे प्रकार होत असल्याने ट्विटरकडून आवाहन करण्यात आले आहे की, यूझर्सनी कुणालाही सहसा न कळणारा पासवर्ड ठेवावा.
याआधी गायक ड्रेक, अमेरिकन फुटबॉल लीग एनएफएलचं अकाऊंटही हॅक केलं होतं.
2015 च्या सुरुवातीला ट्विटरचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि ट्विटर व्हेंचरचे प्रमुख अँथनी नोटो यांचं अकाऊंटही हॅक करण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement