एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फेसबुकवरुन तुमचा डेटाही लीक? ‘असं’ पाहा
तुम्हाला असा मेसेज फेसबुककडून आला नसेल, तरी याचा अर्थ असा नाही की तुमची माहिती सुरक्षितच आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:हून फेसबुकवरील तुमची माहिती सुरक्षित आहे की नाही, हे तपासून पाहायला हवी.
मुंबई : डेटा लीक प्रकरणानंतर अनेक फेसबुक युजर्स गोंधळात आहेत. फेसबुकवरील आपली माहिती सुरक्षित आहे की नाही, याबाबत अनेक युजर्स साशंक आहेत. केम्ब्रिज अॅनालिटिकाने ज्या युजर्सच्या माहितीचा वापर केला आहे, त्यांना फेसबुककडून मेसेज करुन कळवण्यात येत आहे. असे एकूण 8.7 कोटी युजर्स आहेत, ज्यांच्या माहितीचा गैरवापर झाला आहे.
तुम्हाला असा मेसेज फेसबुककडून आला नसेल, तरी याचा अर्थ असा नाही की तुमची माहिती सुरक्षितच आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:हून फेसबुकवरील तुमची माहिती सुरक्षित आहे की नाही, हे तपासून पाहायला हवी. यासाठी आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स देणार आहोत.
‘असं’ पाहा तुमचा डेटा लीक झाला आहे की नाही ते :
- फेसबुकवरील तुमची माहिती सुरक्षित आहे की नाही, ते पाहण्यासाठी सर्वात आधी फेसबुकच्या ‘हेल्प सेंटर’मध्ये जा.
- ‘हेल्प सेंटर’मध्ये जाण्यासाठी इथे क्लिक करा. सर्च बॉक्समध्ये ‘cambridge analytica’ लिहा.
- त्यानंतर तुम्हाला “How can I tell if my info was shared with Cambridge Analytica?” असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर फेसबुक तुम्हाला तुम्ही किंवा तुमच्या मित्राने “This Is Your Digital Life.” यावर लॉग-इन केले की नाही, ते सांगेल.
- हे तेच अॅप आहे, ज्याद्वारे केम्ब्रिज अॅनालिटिकाने फेसबुकचा डेटा अॅक्सेस केला होता.
- जर इथे तुम्हाला तुमचा डेटा सुरक्षित असल्याचा मेसेज दिसला, तर तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
करमणूक
राजकारण
Advertisement