ही अॅप्स भारतात Twitter ला पर्याय ठरू शकतात, यांची वैशिष्ट्ये जाणून घ्या
मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची संख्या देश आणि जगात सतत वाढत आहे. यात ट्विटर सर्वाधिक लोकप्रिय आहे. परंतु, आता लोक इतर पर्यायांकडेही वळत आहेत.
नवी दिल्ली : लोकप्रिय मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर आणि भारत सरकारमध्ये काही दिवसांपासून तणाव सुरु आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांसह लाखो लोकांनी ट्विटर पर्याय शोधण्यास सुरवात केली. अशा परिस्थितीत इतर बर्याच अॅप्सच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. त्यापैकी सर्वात देशी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे कू अॅप डाऊनलोड केले गेले. आज आम्ही तुम्हाला अशाच मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मविषयी सांगत आहोत, जे देशातील ट्विटरला पर्याय ठरू शकतात.
Koo App
हा मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म देशात सध्या धुमाकूळ घालत आहे. बरेच मंत्री आणि सेलिब्रेटीही हे अॅप वापरत आहेत, ज्यामुळे त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही महिन्यांत या अॅपच्या वापरामध्ये वाढ झाली आहे. लोकं याला ट्विटरची देशी आवृत्ती म्हणून विचार करीत आहेत. हे अॅप मेड इन इंडिया आहे. हे बर्याच भारतीय भाषांमध्ये वापरले जाऊ शकते, ज्यामुळे ते विशेष बनते.
Tumblr
हे अॅप देश आणि जगात खूप वापरले जाणारे आहे. या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची मालकी याहूकडे आहे. जगातील कोट्यावधी लोक हे व्यासपीठ वापरतात. हे ट्विटरसारखेच खूप लोकप्रिय आहे. या प्लॅटफॉर्मवर आपण मजकूर, फोटो, व्हिडिओ आणि लिंक शेअर करू शकतो. हे वापरणही सोपं आहे. Tumblr हे ट्विटरचा जगभरातला सर्वात मोठा स्पर्धक मानला जातो.
Plurk
या मायक्रो ब्लॉगिंग अॅपची स्थापना मे 2008 मध्ये झाली होती. हे व्यासपीठही ट्विटरप्रमाणे काम करते. याची काही वैशिष्ट्ये युनिक आहे. या प्लॅटफॉर्मवर, आपण 210 कॅरेक्टर्स शेअर करू शकतो, जो कि ट्विटरपेक्षा अधिक आहे. या व्यासपीठावर आपण ग्रुप चर्चा करू शकतो. त्याची लोकप्रियता सतत वाढत आहे. येत्या काही दिवसांत, वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढू शकते.