एक्स्प्लोर
VIDEO : चित्तथराराक... काळजाचा ठोका चुकवणारा सुपर्ब स्टंट!

मुंबई : काळजाचा ठोका चुकवणारा क्षण... चित्तथरारक... अशाच शब्दांत या व्हिडीओचं वर्णन करता येईल. खरंतर आतापर्यंत तुम्ही अनेक थरारक व्हिडीओ पाहिले असाल, मात्र असा व्हिडीओ कधीच पाहिला नसाल.
मेलिसा अँड्रझेस्व्की, स्केची अँडी ल्युईस आणि जिमी फिट्झपेट्रिक या तिघांनी मिळून हा थरारक स्टंट केला आहे. मेलिसा पायलट असलेल्या विमानाच्या वरुन जिमी बाईक उडवतो, तर बाईक आणि विमानाच्या स्टंटदरम्यान आपलं चित्त न हरवता दोरीवरुन स्केची चालत राहतो, असा हा स्टंट आहे.
मेलिसा ही एरोबेटिक पायलट आहे, स्केची हायलायनर, तर जिमी फ्री स्टाईल बाईकर आहे. मेलिसाने आपल्या यूट्यूब चॅनेलवरुन अपलोड केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाख 32 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
पाहा व्हिडीओ –
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















