Device Hacking: जर तुम्हाला 'हे' पाच संकेत मिळत असतील, तर समजून जा की, तुमचा मोबाईल हॅक झाला
Device Hacking : हॅकर्स मैलिशियस अॅप्सद्वारे प्रसिद्ध लोकांना तसेच सामान्य लोकांना आपला टार्गेट बनवत आहेत.
Device Hacking : भारतात मोबाईल हॅकिंग (Mobile Hacking) आणि ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. हॅकर्स मैलिशियस अॅप्सद्वारे प्रसिद्ध लोकांना तसेच सामान्य लोकांना आपला टार्गेट बनवत आहेत. मात्र, या मैलिशियस अॅप्स आणि टूल्सचा शोध घेणे खूप कठीण आहे, कारण ते डिव्हाइसमध्ये खोलवर लपतात. डिव्हाइसला मालवेअरची लागण झाल्यानंतरही, फोन हॅक झाला आहे की नाही? हे समजण्यासाठी अनेक संकेत आहेत. आज या बातमीत मोबाईलमधील त्या संकेताबाबत सांगणार आहोत. जाणून घ्या
मोबाईलची बॅटरी झपाट्याने संपते
जर तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत असेल, तर तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर असण्याची शक्यता आहे. हे मालवेअर मोबाईल अॅप्स जास्त बॅटरी वापरतात. मात्र, काही वेळा फोनच्या बॅकग्राउंडमध्ये मोबाइल अॅप चालू असल्याने बॅटरी लवकर संपते. अशा परिस्थितीत आधी बॅकग्राउंडमध्ये चालणारे मोबाइल अॅप बंद करा आणि नंतर बॅटरीच्या वापराकडे लक्ष द्या.
मोबाईल अॅप वारंवार क्रॅश
मोबाईल अॅप्स वारंवार क्रॅश होणे सामान्य नाही. स्मार्टफोन हॅक झाल्यामुळे अॅप्स क्रॅश होऊ लागतात. तुम्ही निष्कर्षावर जाण्यापूर्वी, अॅप अपडेटेड आहे की नाही? हे पाहण्यासाठी कृपया Google Play Store तपासा. काहीवेळा अॅप अपडेट न झाल्यामुळे देखील मोबाईल अॅप क्रॅश होतात.
संशयास्पद पॉपअप आणि जाहिराती
अनेक वेळा आपण थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करतो, त्यानंतर आपल्या स्मार्टफोनवर संशयास्पद पॉपअप जाहिराती दिसू लागतात. अशा स्थितीत मोबाईलमध्ये मालवेअर असण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्स वापरू नका. असे केल्याने तुमचा डेटा सुरक्षित राहील.
स्मार्टफोन ओव्हरहिटिंग
जर तुमचा मोबाईल आपोआप गरम होत असेल, तर तुमचे डिव्हाईस हॅक झाले आहे असे समजा. हॅकर्स तुमचा फोन ऑपरेट करत आहेत.
फ्लॅशलाइट चालू
जर तुमच्या मोबाईलचा फ्लॅश लाईट आपोआप चालू झाला. त्यामुळे तुमचा फोन हॅक झाला असण्याची शक्यता आहे. हे शक्य आहे की हॅकर्स तुमचे डिव्हाइस वापरत आहेत. हे टाळण्यासाठी फोन ताबडतोब फॅक्टरी रीसेट करा, जेणेकरून फोनमध्ये असलेले मालवेअर डिलीट होईल.
हॅकिंग कसे टाळाल?
-कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.
-कोणताही संशयास्पद मेल उघडू नका.
-तुमच्या डिव्हाइसवर कोणतेही अॅप केवळ अधिकृत स्टोअरमधून डाउनलोड करा.
-डिव्हाइसच्या कॅमेरासाठी कव्हर वापरा.
-तुमचे डिव्हाइस नेहमी अपडेट ठेवा.
- तुमचा डेटा कोणाशीही शेअर करू नका.
इतर महत्वाच्या बातम्या
Viral Video : 'फॉरेनची पाटलीण' चक्क शेतात करतेय कांदा पेरणी! सासू झाली खूश, नेटकरी आश्चर्यचकीत!