एक्स्प्लोर

Samsung कडून iPhone12 ट्रोल; काय आहे कारण?

Apple ने आपल्या iPhone 12 सीरिजचे चार फोन बाजारात आणले आहेत.अॅपलचे सर्व फोन 5G च्या सुविधेने युक्त आहेत.

मुंबई : दोन दिवसांपूर्वी झालेल्या Apple च्या iPhone12 च्या लॉंचिंग कार्यक्रमाने अनेकांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याची संधी दिली. यामागचे कारण म्हणजे iPhone12 ने त्यांच्या वापरकर्त्यांना चार्जर आणि इअरपॉडची सुविधा दिली नाही. मंगळवारी iPhone12 च्या लॉचिंग कार्यक्रम मोठ्या शानदार पद्धतीने झाला. या कार्यक्रमात कंपनीने चार फोन लाँच केले. ते सर्व 5G तंत्रज्ञानाने युक्त आहेत. ते नेक्स्ट जनरेशन हाय स्पिड वायरलेस नेटवर्कशी जोडले जातील.

Apple ने आपल्या Hi Speed इव्हेंटमध्ये iPhone 12 सीरिज लॉंच केली आहे. Apple ने आपल्या या इव्हेंटमध्ये iPhone 12 सीरिजचे चार फोन लॉन्च केले आहेत. यामध्ये iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro max या आयफोनचा समावेश आहे. सोबतच नवीन ऑडियो साधने ज्यात होम पॅड आणि मिनी स्मार्ट स्पिकरचा समावेश आहे. नविन iPhone 12 बॉक्समध्ये USB-C ची सुविधाही देण्यात आली आहे.

चार्जरची सुविधा न दिल्याबद्दल मात्र iPhone12 हा सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे. यात त्यांची स्पर्धक कंपनी Samsung नेही Apple ला चांगलाच टोला हाणला आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर Galaxy adapter चा फोटो शेअर केला असून त्यात त्यांनी included your Galaxy या शिर्षकाखाली तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी बेसीक चार्जरसह कॅमेरा आणि इतर बऱ्याच सुविधा Galaxy स्मार्टफोन देत असल्याचं म्हटलं आहे.

फोनसोबत चार्जर न देण्याच्या तक्रारीवर Apple कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, 'अनावश्यक कचरा टाळण्यासाठी त्यांनी आपला आयफोन 12 सोबत चार्जर दिलेला नाही.' यासंदर्भात बोलताना जगात 2 अब्जपेक्षा जास्त Apple adapter आधीपासूच आहेत. तसेच आमच्या अनेक ग्राहकांकडे एअरपॉड किंवा हेडफोन आहेत, असे कंपनीचे पर्यावरण, पॉलिसी आणि सोशल इनिशिएटीव्ह विभागाचे उपाध्यक्ष लिसा जॅक्सन म्हणाले.

''वरील गोष्टी न दिल्यामुळे iPhone12 बॉक्स हा अधिक लहान झाला असून आमच्या शिपींग पॅलेटमध्ये आम्ही 70 टक्के अधिक वस्तू बसवू शकतो. त्यामुळे iPhone12 च्या वापरकर्त्यांनी इअरपॉड आणि USB power adapter हे स्वतंत्रपणे विकत घ्यावे लागेल" असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget