अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल, फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल : प्राइम मेंबर्स अन् प्लस सदस्यांना खास सवलत
Amazon Great Indian Festival, Flipkart's Big Billion Day Sale : अॅमेझॉन प्राइम मेंबर्स असलेले ग्राहक एक दिवस आधीचं सेलचा लाभ घेऊ शकतात. तर फ्लिपकार्ट प्लस सदस्य चार तास आधी खरेदी करु शकणार आहेत.
Amazon Great Indian Festival, Flipkart's Big Billion Day Sale: सणासुदीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मेगा सेलची घोषणा केली आहे. यात आघाडीवर असलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनीने देखील आपले सेलचे पेटारे खोलले आहेत. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची सुरुवात 17 ऑक्टोबरपासून होणार आहे. तर फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेस 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
फ्लिपकार्टची बिग बिलियन डे 2020 ची सेल 15 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता प्लस सदस्यांसाठी आणि इतर सर्वांसाठी 16 ऑक्टोबर रोजी सुरू होईल. दोन्ही वेबसाइट्स मोबाइल फोन, टीव्ही, लॅपटॉप, स्पीकर्स आणि तंत्रज्ञान उत्पादनांपासून विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री करतील.
या सेलमध्ये ग्राहकांना आकर्षक फेस्टीव सूट, फ्लॅश विक्री मोबाइल फोन, हेडफोन्स, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या विक्रीच्या अनुषंगाने अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांनी काही प्रमुख डिल्स आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
टीप : महत्वाचं म्हणजे अॅमेझॉन प्राइम मेंबर्स 17 ऑक्टोबरपासून सुरू होणारा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचा एक दिवस आधीचं लाभ घेऊ शकतात. तर 16 ऑक्टोबरला सुरू होणारा फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेलचा प्लस वापरकर्त्यांना चार तास आधीच लाभ घेता येणार आहे.
OnePlus 8T आज व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लाँच होणार; किमतीसह स्पेसिफिकेशन जाणून घ्या
अॅमेझॉन प्राइम मेंबर्स आणि फ्लिपकार्ट प्लस सदस्य असलेल्या ग्राहकांना इतर ग्राहकांच्या तुलनेत जास्त बेनिफिट्स मिळणार आहे. या लाभ लवकरात लवकर डिल्स, सवलत, फ्लॅश विक्री आणि विनामूल्य शिपिंगच्या दृष्टीने हे फायदे मिळू शकतात.
प्राइम आणि प्लस सदस्यता घेण्यासाठी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट अॅप्स डाउनलोड करुन प्रीमियम ग्राहकांना मिळणारे फायदे घेऊ शकतात. सदस्यत्व घेऊन तुम्ही समाधानी नसल्यास विक्री संपल्यानंतर आपण सदस्यता रद्द देखील करू शकता. ते फुकट आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांना माहित आहे की ग्राहक हे करतात. प्रीमियम सदस्यता वाढविण्याच्या उद्देशाने वापरकर्त्यांना हा पर्याय देण्यात आला आहे. कारण त्यातील बहुतेक फायदे मिळवल्यानंतर मेंबर राहयचं की नाही गे ठरवतात.
तुम्ही खरेदी करण्याअगोदर डिल्स चेक करु शकता. जे ग्राहक अॅमेझॉन प्राइम आणि फ्लिपकार्ट प्लस सदस्य नाहीत ते फ्री प्रिमियम ट्रायल मेंबरशीप घेऊ शकतात. अॅमेझॉनची प्राइम मेंबरशीप घेण्यासाठी तुम्हाला वर्षासाठी 999 रुपये मोजावे लागतील. अॅमेझॉन आपल्या ग्राहकांना एक महिन्याची मेंबरशीप देखील देतो. त्यासाठी 129 रुपये भरावे लागतील. तर फ्लिपकार्ट मेंबर्स 200 कॉईंन्स वापरून मेंबरशीप घेऊ शकतो. मात्र, हे कॉईंन्स मागील 12 महिन्यातील असल्याची अट आहे.