एक्स्प्लोर

सॅमसंग गॅलक्सी नोट 7 चा खिशात स्फोट, कंपनीवर खटला

फ्लोरिडा : सॅमसंग गॅलक्सी नोट 7 स्मार्टफोनच्या बॅटरीचे चार्जिंग करताना स्फोट होत असल्याचं वारंवार ऐकायला मिळत होतं. वाढत्या तक्रारींमुळे अखेर कंपनीने जगभरातून स्मार्टफोन परत मागवले. मात्र फ्लोरिडात एका यूझरने खिशातच नोट 7 फोनचा स्फोट झाल्याची तक्रार केली आहे. जोनाथन स्ट्रॉबेल नावाच्या व्यक्तीने सॅमसंग विरोधात दाखल केलेला खटला कदाचित अमेरिकेतील पहिलंच उदाहरण असल्याचं म्हटलं जात आहे. सॅमसंगने जगभरातून फोन परत मागवल्याच्या दुसऱ्याच दिवशी स्ट्रॉबेलने तक्रार दाखल केली आहे. खिशातच फोनचा स्फोट झाल्याने उजव्या पायाला भाजल्याचं तक्रारकर्त्याने म्हटलं आहे. सॅमसंग गॅलक्सी नोट 7 स्मार्टफोनच्या बॅटरीचे स्फोट होत असल्याच्या 92 तक्रारी आतापर्यंत अमेरिकेत नोंदवल्या गेल्या होत्या. यामध्ये भाजल्याच्या 26, तर फोनचं नुकसान झाल्याच्या 55 तक्रारी होत्या. खटला दाखल करण्यात आला नव्हता. सॅमसंग गॅलक्सी नोट 7 च्या बॅटरी चार्जिंग करताना होणाऱ्या स्फोटाची धास्ती भारतीय हवाई वाहतूक मंत्रालयालाही वाटत आहे. चेक इन बॅग्समध्ये गॅलक्सी नोट 7 स्मार्टफोन नेण्यास प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विमान प्रवासात हे फोन स्वीच्ड ऑफ ठेवण्याची अटही ठेवण्यात आली आहे. जगभरातून 2.5 मिलियन म्हणजे 25 लाख ‘गॅलक्सी नोट 7’ फोन परत मागवले जाणार आहेत. त्याऐवजी दुसरे मोबाईल कंपनी ग्राहकांना देणार आहे. सध्या नवीन ‘गॅलक्सी नोट 7’ ची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. फोनच्या निर्मितीदरम्यान झालेली चूक दुरुस्त होण्यास 2 आठवड्यांचा कालावधी लागेल, त्यानंतर वितरकामार्फत नवीन फोन बाजारात आणले जातील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
Embed widget