एक्स्प्लोर
सॅमसंगच्या सर्वात महागड्या स्मार्टफोनचे फीचर्स लीक
मुंबई: सॅमसंग लवकरच आपल्या Note सीरीजमधील नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. याच दरम्यान या मोबाइलचे फीचर्सही लीक झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनची किंमत 999 युरो (म्हणजेच 72,100 रुपये) असण्याची शक्यता आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन ठरु शकतो. या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ड्युल कॅमेरा सेटअपही असणार आहे.
हे दोन्ही कॅमेरे 12 मेगापिक्सल असतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसंच यात फिंगरप्रिंट सेंसरही असेल. असंही समजतं आहे की, या नव्या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम, स्नॅपड्रॅगन 835 आणि 3300 mAh बॅटरी देण्यात येईल. रिपोर्टनुसार, हे स्मार्टफोन ब्लॅक, गोल्ड आणि ब्ल्यू कलरमध्ये उपलब्ध असतील.
त्यामुळे सॅमसंगचा नवा स्मार्टफोन आयफोनला टक्कर देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement